मुंबई-पुणेकर प्रवाशांच्या सर्वात आवडती रेल्वे गाडी म्हणून ओळखली जाणाऱ्या दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीनला नवा साज मिळाला आहे. १ जून १९३० या दिवशी डेक्कन क्वीन ने पहिला मुंबई-पुणे प्रवास केला आहे तर आज मितीला या गाडीला ९१ वर्ष पूर्ण झाली असून एक्स्प्रेसला प्रवाशांची नेहमीच पसंती असल्याने गाडीचे आरक्षण नेहमीच फुल्ल असते. आता ही रेल्वेगाडी नव्या विशेष रूपात पाहायला मिळणार आहे.
भारतीय रेल्वेच्या १६९ वर्षांच्या इतिहासात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ने वेगळीच छाप पाडली आहे. डेक्कन क्वीन ही भारतातील पहिली सुपरफास्ट रेल्वे असून, या रेल्वे गाडीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही काही कमी नाहीये. सव्वा तीन तासात ही रेल्वे गाडी मुंबईहून पुण्यामध्ये पोहोचवणारी विशेष गाडी आहे.
हे ही वाचा :
सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा
‘पोलिस’ निघाले चोर; २२ लाख लुटले
‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’
आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
आता हीच गाडी आपत्याला नव्या ऐटीत, नव्या ढंगात धावताना दिसणार आहे. हिरव्या लाला रंगाची रंगसंगती डायनिंग कार हे या गाडीचे नवे वैशिष्ट्य आहे. तर डेक्कन क्वीनचा कायापालट झाल्यानंतर नवीन कोचमुळे प्रवासी क्षमता सुद्धा वाढली आहे. या नव्या देखण्या रुपामुळे डेक्कन क्वीनचा थाट आणखी वाढणार आहे. तसेच डेक्कन क्वीनची नवीन रंग संगती छान असून लोणावळा, खंडाळा येथील घाटातून प्रवास करताना ही रेल्वे निसर्गाचा भाग असल्याचे वाटते. रेल्वेची येथील निसर्गाशी मिळते जुळते रंग आहेत. असे विधान डेक्कन क्वीनचे प्रवासी जितेंद्र तांबे यांनी केले.