आनंदाची बातमी…गुंदवली-दहिसर मेट्रो आता अर्धा तास उशिरापर्यंत चालणार

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मोठी सुविधा

आनंदाची बातमी…गुंदवली-दहिसर मेट्रो आता अर्धा तास उशिरापर्यंत चालणार

महामुंबई मेट्रोचा मेट्रो लाइन २ ए आणि ७ वरील मेट्रो सेवांच्या रात्रीच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे गुंदवलीहून अंधेरी आणि दहिसर पूर्वेकडून गुंदवलीसाठी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मोठी सुविधा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जानेवारी रोजी या दोन्ही मार्गिकाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले होते.

आता या मेट्रो मार्गावरून शेवटची मेट्रो गाडी रात्री १० वाजून ९ मिनिटांच्या ऐवजी १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल. मेट्रो लाइन २ ए आणि ७ शेवटच्या गाडीची वेळ रात्री १०. ३० पर्यंत वाढवण्यासाठी या दोन्ही मार्गांवर दोन अतिरिक्त सेवा सुरू केल्या जाणार आहेत. ही अतिरिक्त मेट्रो सेवा सुरुवातीला दोन महिन्यांसाठी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महामुंबई मेट्रोने म्हटले आहे.

दरम्यान, या मार्गिका सुरू झाल्याने पश्चिम उपनगरात पूर्व आणि पश्चिमेला मेट्रो मार्गिका उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या
या दोन मार्गिका सुरु झाल्यामुळे बस आणि लोकलमधील त्रास आणि वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे. मेट्रोचे कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त ६० रुपये असे तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो सेवांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय महामुंबई मेट्रोने घेतला आहे. या अतिरिक्त सेवांना मिळणार प्रतिसाद लक्षात घेऊन सेवा वाढवण्याचा विचार करू असे एमएमआरडीएचे आयुक्त अध्यक्ष एस व्ही आर श्रीनिवास यांनी सांगितले.

हे ही वाचा:

खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा

वरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

लगानची कॉमेंट्री झाली मूक .. जावेद खान यांनी घेतला जगाचा निरोप

सत्यजित तांबे ट्विटमधून नेमके म्हणताहेत तरी काय?

मुंबईतील मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना आता मेट्रोची संपूर्ण माहिती ‘यात्री’ एपवर उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातील तिन्ही मेट्रो मार्ग आणि मोनो रेल्वेचे वेळापत्रक त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय प्रवासी आता त्यांच्या व्हॉट्सएपवरून मेट्रो-१ मार्गाचे म्हणजेच घाटकोपर-वर्सोवा मेट्रोचे तिकीट काढू शकतात.

मुंबईच्या लोकल ट्रेनची माहिती देणाऱ्या यात्री एपवर आता मेट्रो आणि मोनो रेल्वेचीही सर्व माहिती उपलब्ध आहे. सध्या मुंबईत तीन मेट्रो सेवा कार्यरत आहेत – मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ए (अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व) आणि मेट्रो ७ (गुंदवली ते दहिसर पूर्व). याशिवाय शहरात अनेक वर्षांपासून मोनो ट्रेनची सेवाही सुरू आहे. या तिन्ही सेवांची माहिती आता ‘यात्री’ ए पवर मोफत उपलब्ध आहे. संपूर्ण सेवा वेळापत्रक एपमध्ये दिलेले आहे.

 

Exit mobile version