‘ब्लू डार्ट’च्या सेवेचे नवे नाव; आता डार्ट प्लस नव्हे ‘भारत डार्ट’

लॉजिस्टिक क्षेत्रातील प्रमुख ‘ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड’ कंपनीचे पाऊल  

‘ब्लू डार्ट’च्या सेवेचे नवे नाव; आता डार्ट प्लस नव्हे ‘भारत डार्ट’

भारत की इंडिया या नावावरून देशात सध्या राजकारण तापलेलं असताना लॉजिस्टिक क्षेत्रातील एका प्रमुख कंपनीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील प्रमुख ‘ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड’ने आपल्या एका सेवेचे नाव बदलले आहे. त्यांनी त्यांच्या डार्ट प्लस सेवेचे नाव ‘भारत डार्ट’ असे ठेवत रीब्रँड केले आहे.

‘डार्ट प्लस’ सेवेचे रीब्रँड करण्याचा ब्लू डार्टचा निर्णय हा एक व्यापक शोध आणि संशोधन प्रक्रियेतून आला आहे. ज्याचा उद्देश हा ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्याचा आहे. “हे धोरणात्मक परिवर्तन ब्लू डार्टच्या चालू प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे, ज्यामुळे भारताच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी त्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे,” असे कंपनीने बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

ब्लू डार्टचा विस्तार हा देशभरातील ५५ हजारांहून अधिक ठिकाणांवर आणि जगभरातील २२० देश आणि प्रदेशांमध्ये आहे. आपल्या उपक्रमांद्वारे ब्लू डार्टने लक्षणीय विस्तार केला आहे.

हे ही वाचा:

व्यावसायिक हेमंत पारीख अपहरण प्रकरणी राजस्थानातील टोळीला अटक

इसीसच्या पुणे मॉड्युलमधील फरार संशयितांवर प्रत्येकी ३ लाखाचे इनाम

हसवणारे ‘बिरबल’ काळाच्या पडद्याआड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला

ब्ल्यू डार्टचे व्यवस्थापकीय संचालक बाल्फोर मॅन्युएल म्हणाले की, “आम्ही देशाच्या सर्व भागात सेवा सुरू ठेवत असताना हे रीब्रँडिंग आमच्यासाठी एक रोमांचक परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते. भारत डार्ट हे आमच्या कंपनीसाठी आणि आमच्या देशासाठी नवीन आणि रोमांचक अध्यायातील पहिले पाऊल आहे. आमची क्षमता वाढवण्यासाठी आणि एकूण ग्राहक अनुभव वाढवण्यासाठी आम्ही आमच्या कौशल्याचा फायदा घेण्यासाठी समर्पित आहोत.”

Exit mobile version