संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस विमानाला इस्रायलच्या अत्याधुनिक हवेतल्या हवेत मारा करू शकणाऱ्या पाचव्या पिढीचे क्षेपणास्त्र जोडण्यात आले आहे. या बद्दल डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने ही माहिती दिली आहे.
तेजस या विमानाला पाचव्या पीढीचे पायथन हे हवेतल्या हवेत लक्ष्यभेद करणारे क्षेपणास्त्र जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता तेजसवरून डागता येणाऱ्या अस्त्रांच्या संख्येत वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम
महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण
लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?
‘या’ गावात झाले पंचेचाळीस वर्षावरील सर्वांचे १००% लसीकरण
या विमानावरून पायथन आणि डर्बी या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली गेली. डर्बीची या क्षेपणास्त्राची हवेतल्या हवेत नजरेच्या टप्प्याच्या पलिकडील लक्ष्याचा देखील भेद करण्याची क्षमता यावेळी चाचणी दरम्यान तपासण्यात आली.
पायथन-५ आणि डर्बी ही दोन्ही क्षेपणास्त्रे इस्रायली संरक्षण संशोधन कंपनी राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीमने विकसित केली आहेत.
पायथन-५ च्या निर्मात्यांनी सांगितल्यानुसार हे क्षेपणास्त्र नजरेच्या टप्प्याच्या बाहेरील क्षमतेच्या अगदी जवळून डागता येते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता जबरदस्त आहे, त्याशिवाय हे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रत्युत्तराचा देखील सामना करू शकते आणि कुठल्याही परिस्थितीत लक्ष्यभेद करण्यास समर्थ आहे. त्याशिवाय हे क्षेपणास्त्र विमानाच्या कोणत्याही दिशेत डागता येण्याची क्षमता आहे.