भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीने बदलले रूप

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीने बदलले रूप

बीसीसीआयने बुधवारी एका नवीन जर्सीचे अनावरण केले. भारतीय क्रिकेट संघ टी -२० विश्वचषकात ही नवीन जर्सी घालून मैदानात उतरेल. नवीन किटला ‘बिलियन चीयर्स जर्सी’ असे म्हटले जात आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या जी जर्सी वापरात आहे ती १९९२ साली विश्वचषकात घातलेल्या जर्सीच्या थीमवर आहे. ही नवी जर्सी या १९९२च्या थीम जर्सीची जागा घेईल. जी भारतीय संघ २०२० च्या अखेरीपासून परिधान करत होता.

“बिलियन चीयर्स जर्सी सादर करत आहे! जर्सीवरील रंगछटा अब्जावधी चाहत्यांच्या समर्थनाने प्रेरित आहेत.” बीसीसीआयने केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहची नवीन जर्सीमध्ये खेळतानाची प्रतिमा अपलोड करताना ट्विट केले.

भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सने ही जर्सी लाँच केली आहे. “हा फक्त एक संघ नाही, ते भारताचा अभिमान आहेत. ही फक्त एक जर्सी नाही, ती एक अब्ज चाहत्यांचा आशीर्वाद आहे. टीम इंडियाला विश्वचषकात समर्थन करण्यासाठी सज्ज व्हा.” असे ट्विट एमपीएल स्पोर्ट्सने केले आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या

काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?

महिन्याचा पास सक्तीचा असल्यामुळे विनातिकीट प्रवाशांची गर्दी

शरद पवार आयकर छाप्यांबाबत बोलणार?

गडद निळ्या पॅटर्नसह नवीन किट, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पारंपारिक नेव्ही ब्लू बॅकची जागा घेतली. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाने १९९२ च्या विश्वचषक जर्सीसारखी एक जर्सी घालून मालिका खेळली होती. ज्यात निळे, हिरवे, लाल आणि पांढरे पट्टे होते.

Exit mobile version