महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नवीन मिसिंग लेन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. खोपोली ते कुसगाव दरम्यान जाणाऱ्या या नवीन मार्गाचे सध्या ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगाने सुरू आहे.नवीन लेनचे बांधकाम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल आणि जानेवारी २०२४ मध्ये तो वाहतुकीसाठी खुला होईल असा अंदाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने व्यक्त केला आहे. या मार्गामुळे मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमुळे प्रवास जलद झाला आहे, पण त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, अपघात टाळण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ सुधारण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली आणि कुसगाव दरम्यान नवीन मिसिंग लेन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन मार्ग १९.८० किलोमीटर लांबीचा आहे, आणि बांधकाम फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झाले. नवीन लेनमुळे केवळ मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देखील मिळेल असा एमएसआरडीसीला विश्वास आहे.
या ९५ किमी लांबीच्या या एक्स्प्रेस वेची सतत देखभाल आणि सुधारणा सुरू आहे.१ एप्रिलपासून, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये १८.५१ % वाढ करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावरील टोल दर तीन वर्षांनी वाढवला जातो. शेवटची वाढ १ एप्रिल २०२० रोजी करण्यात आली होती, त्यामुळे या एप्रिलपासून वाढ करणे आवश्यक आहे. पुढील टोल वाढ १ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.३० एप्रिल २०३० पर्यंत आकारल्या जाणार्या टोल दरांबाबतची अधिसूचना ऑगस्ट २००४ मध्ये जारी करण्यात आली होती.
हे ही वाचा:
परब फिटनेसच्या निलेश दगडेचे ‘१००’ टक्के यश; मिळविला मुंबई श्री चा मान
…ही कसली वज्रमूठ ही तर वज्रझूठ!
राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे होऊ शकणार नाहीत
इटलीमध्ये कार्यालयीन कामकाजात आता इंग्रजी भाषेवर बंदी , नियम मोडल्यास होणार दंड
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक हा रस्ता खालापूर टोल बूथ पॉईंटला कुसगावशी जोडेल, द्रुतगती मार्गाच्या संपूर्ण घाट (टेकडी) भागाला बायपास करेल.हा देशातील एक महत्त्वाचा आहे कारण यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.या मार्गावर बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे,