२०२६च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सीमध्ये रंगणार आहे. फिफाने रविवारी याची घोषणा केली. नॅशनल फूटबॉल लीगमधील तगडे संघ असणाऱ्या न्यूयॉर्क जायंट्स आणि न्यूयॉर्क जेट्स हे दोन्ही संघ न्यूजर्सी या शहरातील आहेत.
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको भूषवणार आहे. या स्पर्धेत एकूण ४८ संघ सहभागी होणार असून १९ जुलै रोजी न्यूजर्सीतील ईस्ट रुदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर या स्पर्धेची सांगता होईल.
कॅनडात एकूण १३ सामने होणार आहेत. त्यातील गटसाखळीतील १० सामने टोरोंटो आणि व्हॅनकुवर येथे होतील. तर, मेक्सिकोमध्ये १३ सामने होतील. त्यातील गटसाखळीतील १० सामने मेक्सिको शहर, ग्वाडालाजरा आणि माँटेरी येथ होतील. तर, स्पर्धेतील उर्वरित सामने अमेरिकेतील ११ शहरांमध्ये होणार आहेत. टोरोंटो, मेक्सिको शहर आणि लॉस एंजेल्स येथे त्यांच्या देशाच्या संघाचे शुभारंभाचे सामने होतील.
हे ही वाचा:
‘ग्रॅमी’वर भारतीयांची मोहोर; झाकीर हुसैन यांचा तीन तर, राकेश चौरासियांचा दोन ग्रॅमीने गौरव
द्वेषपूर्ण भाषणाप्रकरणी इस्लामी धर्मोपदेशक ताब्यात!
जो खरा असेल तो ईडीच्या तपासाला सामोरे जाईल, केजरीवालांना गंभीरने लगावला टोला!
‘नव’ नामक वाघाच्या मृत्यूने लुधियाना टायगर सफारी पर्यटकांसाठी झाली बंद!
स्पर्धेत १०४ सामने
अंतिम सामना होणारे स्टेडिअम सन २०१०मध्ये खुले झाले होते. या स्टेडिअमची क्षमता ८२ हजार ५०० आहे. सन २०१६मध्ये येथे कोपा अमेरिका सेंटेनारियो स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. तेव्हा चिलीने लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये दुसऱ्यांदा पराभव केला होता. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सर्वसाधारणपणे ६४ सामने होतात. मात्र यंदा १०४ सामने होणार आहेत. विश्वचषक स्पर्धेत ३२ ऐवजी ४८ संघांना स्थान दिले गेल्यामुळे सामन्यांची संख्या वाढली आहे.
११ जूनला सुरुवात
मेक्सिको शहरातील इस्टॅडिओ अझटेका येथे ११ जून रोजी स्पर्धेतील पहिला सामना रंगेल आणि विश्वचषक स्पर्धा तिसऱ्यांदा आयोजित करणारा मेक्सिको हा पहिला देश ठरेल. याच दिवशी ग्वाडालाजरा येथेही सामना होईल. याआधी सन १९७० आणि १९८६मध्ये मेक्सिकोने विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.