राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू  

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू  

कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रोनने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात मंगळवारी ओमिक्रोनचा धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. आता अशा प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक असणार आहे. नव्या यादीनुसार धोका असलेल्या देशांमध्ये युरोपियन देश, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, हाँगकाँग, ब्राझील, चीन, मॉरिशिअस, बोत्सवाना, न्यूझीलंड, इस्रायल, झिम्बॉम्बे यांचा समावेश आहे. या देशांमधून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी अशी तीन वेळा आरटीपीसीआर चाचणीसुद्धा करण्यात येणार आहे.

एखादा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसेच जर प्रवाशांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सात दिवसांसाठी घरातच विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

चारपैकी मुख्यमंत्री परिवारातील दोन नेते घोटाळेबाजांमध्ये

राज्यात दक्षिण आफ्रिकेसह इतर काही धोका असलेल्या देशांमधून आलेले काही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सहा जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे जीनोम पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात अद्याप एकाही ओमिक्रोनचा रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मंगळवारी देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधून आलेल्या व्यक्ती मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पुण्यात आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेले दोन प्रवासी आहेत.

Exit mobile version