काय तुमचे दात पडलेत ? मग दात बसविण्याचा विचार करत असाल तर सरळ, मुंबई शहरातील नायर दंत रुग्णालय गाठा कारण की, आता नायर दंत रुग्णालय आणि महाविद्यालय येथे दात काढणे किंवा दांत बसवणे, कवळी तयार करणे या सर्व उपचार पद्धतीसाठी साधारपणे ६ ते ७ वेळा रुग्णालयात डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागतात. पण आता याच फेऱ्या वाचणार आहेत. मुंबईतील नायर दंत रुग्णालय आणि महाविद्यालयात डिजिटल दंत प्रयोगशाळा १९ डिसेंबर पासून सुरू करण्यात करण्यात येणार आहे.
दात बसविणे किंवा दात काढणे तसेच नवीन दात बसविणे यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच ही मोजमाप चुकले तर रुग्णालयात अजून फेऱ्या मारण्याची वेळ रुग्णावर येते. तसेच नायर दंत रुग्णालय आणि महाविद्यालयात दात बसविण्यासाठी साधारणतः महिन्याला ३५० ते ४०० रुग्ण येतात. तर या दात बसविण्यासाठी दातांचा माप घेणे, त्याचा साचा तयार करणे, दात बसविण्यासाठी दाताखाली पट्टी तयार करणे अशा अनेक कारणांसाठी रुग्णाला ६ ते ७ वेळा फेऱ्या माराव्या लागतात.
मात्र, यापुढे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आता त्रास कमी होणार आहे. त्यासाठी नायर दंत रुग्णालय आणि महाविद्यालयाने पूर्णतः संगणीकृत डिजिटल पद्धतीच्या प्रयोगशाळेचे नियोजन करण्यात येणार आहे. तर या आत्याधुनिक प्रयोगशाळेत इंट्रा स्कॅनरद्वारे तोंडातील दातांची जागा तसेच त्या दातांचा आकार निश्चित करता येणार आहे. तसेच संगणकाच्या माध्यमातून दाताचा साचा तयार करता येऊ शकतो. या सोप्या पद्धतीमुळे रुग्णांना दात काढणे किंवा नवीन दात बसविणे ही प्रकिया पूर्ण होण्यासाठी २ ते ३ दिवसांचा एवढा कमी कालावधी लागू शकतो.
हे ही वाचा:
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
संघाला विरोध मग पीएफआयच्या पाठीशी का?
अदानींकडे आता प्रणव-राधिका रॉयपेक्षा जास्त शेअर्स; किती वाढले?
या डिजिटल पद्धतीमुळे बनविण्यात येणारा दातांचा आकार, स्वरूप आणि रंग हे मानवी दाता प्रमाणेच असणार आहेत. हे कृत्रिम दात झरकोनिक घटकपासून बनविण्यात येणार आहे. तर तीन फेऱ्यामद्धे नवीन दात बसविण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो.अशी माहिती दंत विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. विश्वास खरसण यांनी दिली. तर ही योजना महानगर गॅस लिमिटेड तांच्या सामाजिक निधीमधून करण्यात येणार आहे. साधारण या प्रकल्पाला तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी करार झाल्यानंतर निविदा प्रकिया पूर्ण झाली आहे. तसेच प्रथम सुरुवातीला २५० ते ३०० रुग्णांना लागणाऱ्या कृत्रिम दाताचे साहित्य महानगर गॅस लिमिटेड पुरवणार आहे तर नंतर महापालिका स्वतः साहित्य खरेदी करेल अशी माहिती नायर दंत रुग्णालय आणि महाविद्यालाचे प्रमुख डॉ.नीलम अंद्राडे यांनी दिली.