क्रिकेट खेळाचे नियम ठरवणाऱ्या एमसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीत बदल केले आहेत. १ ऑक्टोबर पासून हि नवी नियमावली लागू होणार आहे. या नव्या नियमावलीमुळे खेळात अनेक महत्वाचे बदल होणार असून फलंदाजांना मिळणारे अनेक फायदे कमी होणार आहेत. २०१७ नंतर आता तब्बल ५ वर्षांनी क्रिकेटचे नियम बदलले आहेत.
काय आहेत नवे नियम?
क्रिकेटच्या या नव्या नियमावलीनुसार वाईड बॉल, रन आऊट, डेड बॉल, मंकडींग अशा विविध विषयांशी निगडित नियम बदलण्यात आले आहेत. क्रिकेटच्या या नव्या नियमांनुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना चेंडूला थुंकी लावण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. कोविड काळात हा नियम सामन्यांमध्ये पळला जात होता. तोच नियम आता यापुढेही असणार आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकसारखी व्यक्ती मंत्रिमंडळात होती, याचे बाळासाहेबांना काय उत्तर देणार?
मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर
नवाब हटाओ! भाजपाचा आज मुंबईत विराट मोर्चा
तर मंकडींग पद्धतीने जर फलंदाज बाद झाला तर तो धावबाद म्हणून धरला जाणार आहे. या आधी मंकडींग पद्धतीने फलंदाजाला बाद करणे हे अनैतिक मानले जात असे. पण आता या संदर्भातील नवा नियम आल्यामुळे याला अधिकृत परवानगी बहाल करण्यात आला आहे. या सोबतच झेल उडालेला असताना फलंदाजांना क्रीज बदलून स्ट्राईक बदलणे शक्य असणार नाही. खेळाडू झेलबाद झाल्यावर
वाईड बॉल आणि डेड बॉल संदर्भातही नवे नियम करण्यात आले आहेत. जेव्हा मैदानात कोणी प्रेक्षक किंवा प्राणी, पक्षी येऊन खेळ थांबेल तेव्हा तो चेंडू डेड बॉल ठरवलं जाईल. तर गोलंदाज बॉल टाकत असताना फलंदाज त्याला त्रास देण्यासाठी जागा बदलत असेल तर त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी टाकलेला बॉल सरसकट वाईड म्हणून गणला जाणार नाही