महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र जगातील चौथ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या चिंताजनक काळात, सामान्यांसाठी किंचित दिलासा देणारी माहिती समोर आली आहे, ती म्हणजे कोरोनाचा नवा अवतार कमी प्राणघातक असल्याचे मत तज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केले जात आहे.
सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. एकामागोमाग एक मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ वेगाने होताना दिसत आहे. मात्र डॉक्टरांच्या मते नवा विषाणु वेगाने पसरणारा असला तरी, तो प्राणघातक राहिलेला नाही. टाईम्स ऑफ इंडियाने सध्याच्या लाटेची मागच्या लाटेशी तुलना केली होती. सध्या चिंताजनक अवस्था असलेली २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता.
हे ही वाचा:
राहुल गांधी पाकिस्तानी ‘प्रॉपगॅन्डा’ चालवत आहेत का?
राजकीय मिस मॅनेजमेंट मुळे महाराष्ट्र इटलीच्या मार्गावर
बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर ‘या’ माजी अमेरिकन खासदाराने जगाला सुनावले
या महामारीचे दोन टप्पे ककरता येतात. पहिल्या टप्प्यात जानेवारीपासून सुरूवात झाली, सप्टेंबर पर्यंत कळस गाठला आणि फेब्रुवारी (महाराष्ट्र, पंजाब सारखी काही राज्ये वगळता) मध्ये पहिली लाट ओसरत चालली. दुसरा टप्पा म्हणजे पुन्हा एका रुग्णवाढ होताना दिसत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या डेटानुसार महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि चंदीगढ या राज्यात कोरोनाची दुसरी लाट कळसाला पोहोचली असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे.
या लाटेमध्ये होणाऱ्या मृत्युदरात मात्र मोठी घट झाली आहे. दिल्लीच्या होली फॅमिली हॉस्पिटलमधील क्रिटीकल केअर मेडिसीन विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुमित रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या व्हायरसमध्ये अधिक वेगाने पसरण्याच्या दृष्टीने बदल झाला आहे. कारण मागील वेळेपेक्षा यावेळी कोरोनामुळे होणारा मृत्युदर एक तृतीयांश कमी झाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी देखील इन्फ्लुएन्झा सारख्या विषाणुंमध्ये देखील अशा तऱ्हेचा बदल दिसून आला होता.
त्याबरोबरच सध्याचा मृत्युदर कमी असण्याचे कारण हा विषाणूमुळे सध्ये मोठ्या प्रमाणात तरूण बाधित होत आहेत हे देखील असावे. गेल्या ३० दिवसात बिहार आणि ओडिशा वगळता चिंताजनक परिस्थिती असणाऱ्या २३ पैकी २१ राज्यात सातत्याने रुग्णवाढ नोंदली जात आहे.