परदेशातून येणाऱ्यांना आता सात दिवस क्वारंटाइन

परदेशातून येणाऱ्यांना आता सात दिवस क्वारंटाइन

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आता निर्बंध वाढवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचे नवीन रूप पाहता आंतरराष्ट्रीय विमानतळावरील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. हा ओमिक्रॉन व्हेरियन्टचा नवीन प्रकार पाहता भारत सरकारने अनेक देशांना सर्वाधिक धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात हवाई सेवेवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत.

स्थलांतर विभागाच्या डीसीपी आणि एफआरआरओ यांना आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर येणाऱ्या प्रवाशांकडून गेल्या १५ दिवसांत त्यांनी कोणत्या देशात प्रवास केला आहे, याची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIAL) ला गेल्या १५ दिवसात त्यांच्या फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. चुकीची माहिती देणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होऊ शकते.

भारत सरकारने जाहीर केल्यानुसार कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी विमानतळावर स्वतंत्र काउंटर उभारण्यात यावेत आणि अशा सर्व प्रवाशांसाठी सात दिवस क्वारंटाईन आवश्यक करावे.
जोखीम असलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर पोहोचल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल.

हे ही वाचा:

ट्विटरने नियम बदलले; नवाब मलिक आता शेअर करू शकतील का फोटो?

पेपरफुटीतून विद्यार्थ्यांची पिळवणूक

ममता बॅनर्जी – शरद पवार भेटीत जुन्याच कढीला नव्याने उकळी!

लसीकरण प्रमाणपत्राच्या तपासणीमुळे बस प्रवासी वैतागले

 

एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाकडे कनेक्टिंग फ्लाइट असल्यास, त्यांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RTPCR चाचणी करावी लागेल. कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास, त्यांना कनेक्टिंग फ्लाइटमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल. महाराष्ट्रात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी प्रवास करणार्‍या विमान प्रवाशांना अँटी-कोरोनाव्हायरस लसीचे दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे किंवा त्यांना ४८ तासांच्या आत नकारात्मक RTPCR चाचणी अहवाल दाखवावा लागेल. त्याचवेळी, इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांना RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल ४८ तासांच्या आत आणणे बंधनकारक आहे.

Exit mobile version