पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहकार आणि नागरी विमान वाहतूक ही दोन खाती मंत्री मुरलीधर मोहोळ यांना मिळाली. दरम्यान, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन्ही खात्यांवर जोरदार काम करणार असून सहकार खात्याला अधिक बळकट करणार असल्याचे सांगितले आहे. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहकार आणि नागरी विमान वाहतूक ही दोन खाती मला मिळाली. पुण्याला आता देशातील सर्वोत्तम शहर बनवायच्या उद्देशाने काम करणार आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. परंतु, हे थोडं वेगळं असून शिकण्यासाठी थोडे काही दिवस जातील. सहकार खाते संदर्भात दोन बैठक झाल्या आहेत. आता इथून पुढे माझी खरी परीक्षा आहे, ती म्हणजे कामाची. पुणे करांच्या खूप अपेक्षा आहेत आणि मला खूप काही काम करायचं आहे.
महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे सहकार खात. देशात आठ लाख सहकार संस्था आहेत तर महाराष्ट्रात २.५ लाख सहकार संस्था आहेत. त्यामुळे समाजातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्याला समृद्ध करायचं आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या सहकार संस्थेला सुद्धा आत्मनिर्भर करून अधिक शक्तिशाली बनवण्याचे काम करायचे आहे. नवीन एक राष्ट्रीय सहकार धोरण तयार केले आहे, तीन वर्ष त्याच्यावर खूप काम केलेले आहे. याबाबत एक बैठक होणार होती, परंतु ती झाली नाही.
हे ही वाचा..
वक्फ बोर्ड कायदा संपवावा, जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये बांधावीत!
धक्कादायक: सलूनमध्ये मुस्लिम न्हाव्याने ग्राहकाच्या चेहऱ्याची केली ‘थुंकीने मालिश’!
अमर्याद संपत्ती गोळा करणाऱ्या वक्फ बोर्डाला चाप लावणार कोण?
‘तृणमूल काँग्रेसला मते मिळालेल्या भागातच विकासकामांसाठी पैसा’
सहकाराची पाळंमुळं अगदी खोलपर्यंत गेली आहेत, महाराष्ट्रात हे जाळे खूप मोठे आहे. सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध डेअरी, विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा बँक, पतसंस्था, हा असा खूप मोठा व्याप आहे. त्यामुळे सर्वांचा विचार करून नवीन सहकार धोरण आणलेले आहे. यामध्ये खूप चांगल्या रचना, विषय आणले गेले आहेत. लवकरच हे राष्ट्रीय धोरण जाहीर होईल आणि यामुळे नक्कीच याचा फायदा होईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सहकार खात्यात खूप रस आहे. सहकार मंत्रालय वेगळं करण, ही कल्पना त्यांच्या डोक्यात येण आणि ते प्रत्यक्षात आणण. तीन वर्षात त्यांनी सहकार मंत्रालयाला खूप ताकद दिली, समृद्ध केलं. ‘सहकार विद्यापीठ’ पुण्यात होईल असे अमित शहा म्हणाले होते. वैकुंठ भाई मेहता इन्स्टिट्यूटमध्ये ते करता येईल का याबाबत माझी चर्चा सुरु आहे.