27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषमुंबईतल्या वाढत्या बांधकामामुळे 'ताप' वाढतोय

मुंबईतल्या वाढत्या बांधकामामुळे ‘ताप’ वाढतोय

Google News Follow

Related

सध्याच्या घडीला जगभरातील हवामान हे बदलत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. परंतु मुंबईकरांची होणारी काहिली ही वातावरण बदलाशी नाही तर, मुंबईतील कमी झालेल्या हरितक्षेत्राशी, जलक्षेत्राशी आणि वाढणाऱ्या बांधकामांशी आहे. भारतामधील काही विद्यापीठांनी यासंदर्भात केलेल्या अभ्यासांती ही बाब निदर्शनास आलेली आहे. मुंबईमध्ये सध्याच्या घडीला मोकळी मैदाने कुठेच दिसत नाही. त्यामुळे वाढत्या बांधकामामुळे मुंबईतील तापमानात आता वाढ होऊ लागलेली आहे.

बांधकाम क्षेत्रफळात मात्र ६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून शहरामध्ये उष्म्याची अधिक जाणीव होते. उपग्रहांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला आहे. उष्णता वाढीसाठी काँक्रिट हा महत्त्वाचा घटक असल्याचे निदर्शनास आलेले आहे. शहरीकरणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणामध्येही चांगलीच वाढ झालेली आहे. या व इतर अनेक कारणांमुळे, मुंबईचे तापमान हे पूर्वीपेक्षा अधिक जाणवू लागल्याचे सर्वसाधारण निरीक्षण मुंबईकरांकडून नोंदवण्यात आलेले आहे.

गेल्या पाच ते सहा दशकांपासून शहरांकडे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या नोकरी आणि व्यवसायासाठी आकर्षित होत आहे. या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी नैसर्गिक जागांचा वापर होत असून शहराचे बांधकाम क्षेत्रफळ वाढलेले दिसते असेही या अभ्यासातून निष्कर्ष निघालेला आहे.

सन १९९१ मध्ये मोकळ्या जमिनीचे क्षेत्रफळ ८०.५७ चौरस किमी होते ते सन २०१८ मध्ये ३३.७ किमी झाले. जलक्षेत्रे २७.१९ चौरस किमीवरून २०.३१ चौरस किमीवर आली आहेत. तर हरित आच्छादन, मोकळ्या जमिनी यावरील बांधकामाचे क्षेत्र सन १९९१ मध्ये १७३.०९ चौरस किमी होते; तर सन २०१८ मध्ये ३४६.०२ किमी इतके झाले आहे. ८१ टक्के मोकळ्या जागा, ४० टक्के हरित आच्छादने आणि सुमारे ३० टक्के जलक्षेत्र मुंबईने गमावले आहे.

 

हे ही वाचा:

‘बेस्ट’ कंडक्टरच्या बॅगेत नाण्यांचा खणखणाट

काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा

उल्हासनगरमध्ये लोक छत्री घेऊन जात आहेत शौचालयात… वाचा काय आहे कारण?

‘२५ हजार कोटींचे रस्ते कुणाचे? “ठग्स ऑफ बीएमसी”ला कोण वाचवतंय?’

 

मुंबई या शोधनिबंधाचे मुख्य लेखक जामिया मिलिया इस्लामियाचे भूगोल विभागाचे संशोधक शहाफहाद यांनी नोंदवले. वातावरणातील हरितगृह वायू पृथ्वीला ऊबदार ठेवण्याचे काम करतात. जेव्हा हे प्रमाण वाढते तेव्हा या वायूंमुळे उष्णता वातावरणात अडकून राहते आणि वातावरणात अधिक उष्मा जाणवतो. हरित आच्छादनामुळे उष्णता आणि सूर्यकिरणे शोषून घेण्यासाठी मदत होते. हरित आच्छादन कमी झाल्याने ही उष्णता परावर्तित होते. स्वाभाविकपणे यामुळे तापमानवाढ जाणवते. पाणथळ जागी वाहते पाणी असणे आवश्यक आहे अन्यथा तिथे दलदल निर्माण होऊन मिथेन वायूचे प्रमाण वाढते. मिथेन वायू वातावरणात उष्णता अडकवून ठेवतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तापमानवाढीला चालना मिळते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा