ममता बॅनर्जींच्या आमदाराकडून बाबरी मशीद बांधण्याची घोषणा, १ कोटीही देणार!

दोन एकर जागेवर मशीद उभारणार, ट्रस्ट स्थापनेचेही सांगितले

ममता बॅनर्जींच्या आमदाराकडून बाबरी मशीद बांधण्याची घोषणा, १ कोटीही देणार!

अयोध्येत प्रभू श्री रामांचे मंदिर स्थापन झाल्यानंतर आता बाबरी मस्जिदीचा वाद संपला आहे. बाबरी मस्जिद प्रकरण शांत झाले असले तरी अजूनही काही जणांकडून राजकारण केले जात आहे. याच दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांचे बाबरी मस्जिदवरून एक वादग्रस्त विधान समोर आले आहे.

टीएमसी आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात नवीन बाबरी मशीद बांधणार असल्याची घोषणा केली आहे. कबीर म्हणाले की, मशीद बांधण्याचे काम ६ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होईल. त्यासाठी दोन एकर जागेवर ट्रस्ट स्थापन केला जाईल, ज्यामध्ये मदरशांचे अध्यक्ष आणि सचिव असतील, असे हुमायूनने यांनी म्हटले. मशिदीच्या उभारणीसाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे सांगत स्वतः एक कोटी रुपये देणार असल्याचेही हुमायून कबीर यांनी सांगितले. दोन एकर जागेवर ही मशीद उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या हुमायून कबीर यांनी म्हटले की, बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्के आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिम समाजाच्या भावना आणि अधिकारांकडे विशेष लक्ष दिले आहे.

हे ही वाचा : 

शरद पवारांचा पक्ष म्हणजे गुंड, लुटारुंची टोळी; ते गाडायचे काम देवाभाऊने केले

भूसुरुंग स्फोटात सुरक्षा जवान हुतात्मा!

दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही मंदिर!

वक्फ बोर्डचा मनमानी कारभार, देशातील ९९४ मालमत्ता गिळल्या!

दरम्यान, हुमायून कबीर हे तृणमूल काँग्रेसचे मजबूत नेते आहेत. ममता बॅनर्जींच्या पहिल्या कार्यकाळात ते मंत्री होते. टीएमसीमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. २०११ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर रेजीनगर विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली होती. हुमायून कबीर यांच्या वादग्रस्त विधानांमुळे टीएमसीला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. टीएमसीने अलीकडेच हुमायूनला त्याच्या एका विधानासाठी नोटीसही पाठवली होती.

Exit mobile version