मंगळवारी संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण समितीने आवश्यकता असल्याची स्वीकृती मंजूर करून लष्कराला ₹८,४०० कोटींच्या करारामध्ये ११८ अर्जुन एमके-१ ए रणगाडे मिळविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हे कंत्राट देण्यापुर्वीची शेवटची पायरी म्हणजे संरक्षण समितीची उच्चस्तरीय बैठक, ही बैठक पंतप्रधान, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्यात होते. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि इतर काही उच्चस्तरीय अधिकारी यांचाही समावेश असतो. ही बैठक होणे अजून बाकी आहे.
हे रणगाडे जेंव्हा पुढील तीन वर्षात सैन्यात दाखल होतील, तेंव्हा ते रणगाडे निर्विवादपणे जगातील अत्याधुनिक रंगाड्यांपैकी एक असतील. यामध्ये असलेल्या काही तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे या रणगाड्यांना हा विशेष मान मिळणार आहे. या रणगाड्यांची निर्मिती करणाऱ्यांच्या मते, पाकिस्तानकडे असलेल्या कोणत्याही रणगाड्यांपेक्षा हे रणगाडे निश्चितच खूप जास्त प्रगत असतील.
हे ही वाचा:
अर्जुन एमके -१ हे रणगाडे २००४ मध्ये भारतीय सैन्यात सामील करण्यात आले होते. भारतीय सैन्याकडे असे १२४ रणगाडे आहेत. परंतु एमके-१ ‘ए’ हे रणगाडे पूर्णपणे वेगळे आहेत. या नवीन आवृत्तीमध्ये एकूण ७१ नवीन आणि आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारण्यांमुळे हे रणगाडे जगातील सर्वात अत्याधुनिक रणगाड्यांपैकी असतील.