‘त्या’ ट्विटमुळे रिचा चढ्ढावर नेटकरी संतापले

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या निर्णयाची रिचा चढ्ढाने खिल्ली उडवली.

‘त्या’ ट्विटमुळे रिचा चढ्ढावर नेटकरी संतापले

पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारताच्या हालचालींना वेग आला आहे. भारत सरकारने आम्हाला आदेश दिला, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आम्ही कोणत्याही क्षणी तयार आहोत, असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्त्यवानंतर अनेकांनी त्यांच्या या वक्त्यव्याचे स्वागत केले. मात्र, अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने यासंदर्भात ट्विट करत त्यांच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.

रिचा चड्डाचे ट्विट :

भारतीय सेना ही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणण्यास तयार आहे, असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले. त्यांचे हेच विधान शेअर करत रिचाने ‘गलवानने हाय म्हटलंय’ असं ट्विट केले. रिचाने गलवानसंदर्भात अशा पद्धतीचं ट्विट करून भारत आणि चीनदरम्यान २०२० मध्ये झालेल्या गलवान संघर्षात शहीद जवानांच्या बलिदानाची खिल्ली उडवल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

रिचाने भारतीय लष्कराबद्दल अपमानकारक ट्विट केल्याने तिच्यावर नेटकरी संतापले आहेत. ‘जवानों का मजाक उडाने वालों को यह देश और कुदरत कभी माफ नहीं करेगा’, असं ट्विट दिग्गज निर्माते अशोक पंडित यांनी केले आहे. तर ‘रिचासारखी अशिक्षित अभिनेत्री बॉलिवूडमध्ये का आहे’, असा उपरोधिक सवालही संतापलेल्या नेटकऱ्यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

विक्रम गोखले यांच्या मृत्यूचे खोटे वृत्त व्हायरल

‘काँग्रेस म्हणजे घराणेशाही’

दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?

शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरावे लागते खारे पाणी

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांची चीनी सैनिकांशी चकमक झाली होती. ज्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. तासभर चाललेल्या या चकमकीत अनेक चिनी सैनिकांचाही मृत्यू झाला, परंतु चीनने या लढाईत नेमके किती सैनिक गमावले हे कधीही जाहीर केले नाही.

Exit mobile version