सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल नेटिझन्सना संशय, सुशांतची पुन्हा आठवण

सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल नेटिझन्सना संशय, सुशांतची पुन्हा आठवण

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाच्या बातमीने खळबळ उडाली आहे. अवघ्या चाळीस वर्षीय सिद्धार्थच्या निधनाची बातमी आल्यामुळे सर्वांना धक्का बसला. सोशल मीडियावर सध्या या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. तर अनेकांना सिद्धार्थच्या जाण्याने सुशांत सिंग रजपुत आठवण आली आहे. काहींनी तर सिद्धार्थच्या मृत्युबद्दलही शंका उपस्थित केली आहे.

सिद्धार्थच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे नेटकऱ्यांना सुशांत सिंह राजपूतची आठवण झाली आहे. सिद्धार्थचे अकाली जाणे हे सुशांत सारखेच चटका लावून जाणारे असल्याचे म्हटले जात आहे. तर सिद्धार्थचा मृत्यू नैसर्गिक आहे का? हा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. सिद्धार्थ शुक्लाचा खून तर झाला नाही ना? अशी शंकाही नेटीझन्स कडून विचारले जात आहेत. त्याला कारणही तसेच आहे.

हे ही वाचा:

माजी खासदार चंदन मित्रा कालवश

भारत ओव्हलवर ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढणार?

‘क्लिन चीट’ रिपोर्टसाठी सीबीआय अधिकाऱ्याला देण्यात आली लाच!

बिग बॉस १३ चा विजेता कालवश

सिद्धार्थ हा देखील सुशांत सारखा एका सामान्य कुटुंबातून येणारा तरुण होता. त्याच्यामागे कुठलाही बॉलिवूडचा कौटुंबिक वारसा नव्हता. त्याची देखील सुरुवात सुशांत प्रमाणेच टीव्हीच्या छोट्या पडद्यातून झाली. मॉडेलिंग, रियालिटी शोज आणि मालिकांमधून अभिनय करत सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये आपले पदार्पण केले. सुशांत सिंह राजपूतचाही प्रवास अशाच प्रकारचा होता.

सुशांतच्या मृत्यूला आता तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असतानाही त्याचा मृत्यू नैसर्गिक होता? की त्याची हत्या करण्यात आली होती? हे अजून स्पष्ट झालेले नाही. तर सुशांतला ज्या कूपर रुग्णालयात दाखल केले होते त्याच कूपर रुग्णालयात सिद्धार्थलाही दाखल करण्यात आले होते. त्यामुळेही नेतीझन्सना सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल संशय निर्माण झाला आहे.

Exit mobile version