23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषधक्कादायक! नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला नमविले

धक्कादायक! नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला नमविले

३८ धावांनी मिळविला विजय

Google News Follow

Related

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्ससारख्या कमकुवत संघाने चक्क दक्षिण आफ्रिकेला नमविण्याची कमाल केली. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात पावसामुळे ४३ षटकांचा खेळ झाला. या सामन्यात नेदरलँड्सने ८ बाद २४५ धावा केल्या पण तेवढ्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र २०७ धावांत गारद झाला. त्यामुळे नेदरलँड्सने वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करत २ गुण घेतले.

या सामन्याआधी नेदरलँड्सचा संघ अखेरच्या क्रमांकावर होता. पण आता ते नवव्या स्थानावर पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र तिसऱ्याच क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा संघ मात्र अखेरच्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा:

ठरले; भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार

श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा

आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’

अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

नेदरलँड्सच्या संघाची प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ११२ अशी अवस्था झाली होती. पण स्कॉट एडवर्ड्स (७८) आणि रोल्फ वॅन डर मर्व्ह (२९) यांनी आठव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली आणि नेदरलँड्सला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. आर्यन दत्तनेही २३ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे नेदरलँड्सला २४५ धावा करता आल्या.
या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची स्थिती मात्र बिकट झाली. डेव्हिड मिलरची ४३ धावांची खेळी आणि केशव महाराजच्या ४० धावा वगळता त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एकानेही अर्धशतकी खेळी केली नाही. त्यामुळे ४२.५ षटकांत त्यांचा संघ २०७ धावांत बाद झाला.

 

याआधी, नेदरलँड्सला न्यूझीलंड आणि पाकिस्तानकडून सलग दोन सामन्यात हार पत्करावी लागली होती. त्यामुळे त्यांचे गुणांचे खाते उघडले नव्हते. तर दक्षिण आफ्रिकेने मात्र ऑस्ट्रेलियाला १३४ धावांनी पराभूत केले होते तर श्रीलंकेवर त्यांनी १०२ धावांनी मात केली होती. त्यामुळे सलग तिसरा सामना जिंकून ते हॅट्ट्रिक करतील अशी शक्यता होती. नेदरलँड्सविरुद्ध सामना असल्यामुळे ही हॅटट्रिक पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती पण नेदरलँड्सने सगळे चित्रच बदलून टाकले.
सध्या भारत या तक्त्यात पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात ६ गुण आहेत तर न्यूझीलंड ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रनरेटच्या बाबतीत ते भारतापेक्षा मागे आहेत. तिसरे स्थान आहे ते दक्षिण आफ्रिकेकडे. चौथ्या स्थानावर पाकिस्तान आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा