दहा लाख सदस्यांचा नेटफ्लिक्सला रामराम!

दहा लाख सदस्यांचा नेटफ्लिक्सला रामराम!

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला सलग दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मोठा धक्का बसला आहे. अहवालानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत नऊ लाखाहून अधिक ग्राहकांनी नेटफ्लिक्स बघणे सोडले आहे. कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा तिमाही तोटा आहे. मात्र अजूनही नेटफ्लिक्सचे २२१ दशलक्ष सदस्य आहेत.

नेटफ्लिक्सला सदस्यांनी जोरदार झटका दिला आहे. अनेक वर्षांच्या स्थिर वाढीनंतर सदस्यांनी नेटफ्लिक्सचा वापर थांबवण्याचे प्रमाण वाढलं आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ९ लाख ७० हजार सदस्य कमी झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तीन महिन्यांत दहा लाखाच्या आसपास सदस्य कमी झाल्याने नेटफ्लिक्सचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक वर्षे ओटीटी मार्केटवर राज्य करणाऱ्या नेटफ्लिक्सला आता वॉल्ट डिस्ने को, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आणि ऍपल इंक सारख्या कंपन्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या सर्व कंपन्या त्यांच्या स्ट्रीमिंग सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. पासवर्ड आणि लॉगिन शेअरिंगबाबत कंपनीने अधिक कडक नियम केल्यांनतर नेटफ्लिक्सला एवढ्या मोठ्या तोट्याचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

आता ६० देशात विनाअडचण प्रवास करा!

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

अजूनही, नेटफ्लिक्स कंपनीचे जागतिक पातळीवर २२१ दशलक्ष सदस्य आहेत. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार नेटफ्लिक्स नव्या अ‍ॅड सपोर्ट प्लॅनसाठी मायक्रोसॉफ्टसोबत काम करत आहे. कंपनी हा प्लॅन लवकरच लॉंच करण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत या नवे दहा लाख सदस्य जोडले जातील, अशी नेटफ्लिक्सला आशा आहे.

Exit mobile version