इस्रायल- हमास यांच्यात अजूनही युद्ध सुरु आहे.पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास इस्रायलकडे युध्दविरामाची मागणी करत आहे.गाझामध्ये इस्रायलच्या सैन्याने वेढा घातला आहे.इस्रायलने गाझा पट्टीमधील लढाई कायमची थांबवावी अशी मागणी हमास करत आहे. मात्र, हमासच्या मागण्या इस्रायलने फेटाळून लावल्या आहेत, असे द टाइम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धावरील आपल्या देशाच्या दीर्घकालीन भूमिकेचा पुनरुच्चार केला की, जोपर्यंत हमासचा “संपूर्णपणे नाश” होत नाही आणि ओलिसांची सुरक्षित सुटका होत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही. ते म्हणाले की, हमासला “एक साधा पर्याय देण्यात आला होता – एकतर आत्मसमर्पण करावे किंवा मरावे” कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही.
नेतान्याहू पुढे म्हणाले की, हमासचा नायनाट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.आम्ही विजय मिळवू पर्यंत लढत राहू.जोपर्यंत आम्ही सर्व उद्दिष्टे साध्य करत नाही तोपर्यंत आम्ही युद्ध थांबवणार नाही.आमचे उद्दिष्ट म्हणजे, हमासचा पूर्णपणे नाश करणे आणि आमच्या सर्व ओलीसांची सुटका करणे, ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीर; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान हुतात्मा!
जय श्रीराम म्हणत शबनम शेख निघाली अयोध्येला
प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १३ जणांचा मृत्यू
विजय वडेट्टीवार म्हणतात, जितेंद्र आव्हाड भांबावलेत
इस्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हमासने ओलिस ठेवलेल्यांच्या सुटकेसाठी इस्रायल नवीन टप्प्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. मागील करारानुसार , हमासने १०५ ओलिसांची सुटका केली आणि इस्रायलने आठवड्याभराच्या युद्धबंदी दरम्यान २४० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.“आम्ही इस्रायलमधील आणि इस्रायलच्या बाहेरील प्रत्येकाला हे स्पष्ट केले आहे की, नवीन ओलिसांच्या सुटकेची वेळ आली आहे.इस्रायली आणि कतारी अधिकारी वाटाघाटीसाठी या आठवड्यात दोनदा भेटले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गाझामधील लढाई तीव्र होत चालली आहे.इस्रायली विमानांनी मध्य आणि दक्षिण गाझावर बॉम्बही टाकले, ज्यामुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले, असे रहिवाशांनी सांगितले.