इस्रायल आणि हमास यांच्यातील चार दिवसीय युध्दविरामाचा कालावधी सोमवारी संपला. दरम्यान, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे की, ही युद्धबंदी आणखी दोन दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंमधील चार दिवसांच्या युद्धविरामाच्या शेवटच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम आणखी दोन दिवस वाढवण्यात आला.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाला ओलिसांची यादी मिळाली आहे, याना आज मंगळवारी सोडण्यात येणार आहे, असे द टाइम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे.हमास सदस्य आता युद्धविराम विस्तारानंतर गाझामध्ये ओलिस ठेवलेल्यांची एक नवीन यादी तयार करत आहेत.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लिहिले की, गाझा पट्टीवरील मानवतावादी युद्धविराम वाढवण्यासाठी एक करार झाला आहे.आता यामध्ये दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.ते म्हणाले की, कतार घोषणा करते की, दोन्ही देशात चालू असलेल्या मध्यस्थी अंतर्गत, गाझा पट्टीमध्ये आणखी दोन दिवस मानवतावादी युद्धविराम वाढवण्यासाठी एक करार झाला आहे.
हे ही वाचा:
नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार
हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!
अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!
अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली
या संदर्भात हमासने सांगितले की, कतार आणि इजिप्तसोबत पूर्वीच्या चार दिवसांच्या युद्धविरामप्रमाणेच इस्रायलसोबतच्या युद्धविरामाला दोन दिवसांची मुदतवाढ देण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, इस्रायल आणि हमास ओलिसांच्या चौथ्या अदलाबदलीची तयारी करत आहेत. यापूर्वी रविवारी हमासने आणखी १७ ओलिसांची सुटका केली होती. यामध्ये १४ इस्रायली आणि तीन थायलंड ओलिसांचा समावेश आहे. त्याबदल्यात इस्रायलने ३९ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.या युद्धात आतापर्यंत १५,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, तर इस्रायलमध्ये सुमारे १,२०० लोक मारले गेले आहेत.