२३ जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील इंडिया गेटवर त्यांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा होलोग्राम डिजिटल पुतळा इंडिया गेटवर बसवला जाणार असल्याची माहिती मोदीजींनी ट्विटमध्ये दिली आहे. २३ जानेवारी रोजी नेताजींच्या जयंतीदिनी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण होणार आहे. नेताजींचा हा पुतळा २८ फूट बाय ६ फूट असणार आहे.
” ज्या वेळी संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करणार आहे, तेव्हा मला कळवायला आनंद होत आहे की, इंडिया गेटवर ग्रेनाइटपासून बनवलेली त्यांची भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे.” असे मोदीजींनी ट्विट केले आहे.
हे ही वाचा:
विनयभंग करून पैसे हिसकावून नेणाऱ्याला चोराला २४ तासांतच अटक
पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…
अमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद
स्वतःच्या सुनेला अधिकार न देणारे तौकीर महिलांना काय न्याय देणार?
मोदीजींच्या निर्णयाचे कौतुक केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले आहे. शाह यांनी ट्विटमध्ये,” भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान नेताजींना ही योग्य श्रद्धांजली आहे.” असं ते म्हणाले.
१९३० च्या दशकात सर एडविन लुटियन्सने उर्वरित स्मारकासह बांधलेल्या या कमानीमध्ये एकेकाळी इंग्लंडचे माजी राजे जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. नंतर हा पुतळा १९६० च्या दरम्यान दिल्लीतील कोरोनेशन पार्कमध्ये हलवण्यात आला.
अलीकडेच पंतप्रधान मोदींनी हे जाहीर केले होते की, नेताजींच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिनाचा प्रारंभ होणार आहे. त्यांच्या जयंतीदिनाला ‘पराक्रम दिवस’ असे नावही देण्यात आले आहे.