स्वातंत्र्यपूर्व काळात अखिल भारतीय कॉँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अनोखे स्मरण करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. आता प्रजासत्ताक दिनाची सुरुवात आता २४ जानेवारी ऐवजी २३ जानेवारीपासून म्हणजे नेताजींच्या जयंतीपासून होणार आहे. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ मध्ये झाला होता.
इतिहास आणि संस्कृतीच्या महत्त्वाच्या बाबी साजरे करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
तर १४ ऑगस्टला स्मरण दिवस, ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस, १५ नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस आणि २६ नोव्हेंबरला संविधान दिवस व वीर बाल दिवस साजरा करणाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यात आता सुभाषचंद्र बोस यांची जयंती प्रजासत्ताक दिनाच्या समारोहात साजरी केली जाणार आहे.
हे ही वाचा:
संगीतद्वेष्ट्या तालिबान्यांनी भरचौकात जाळली वाद्ये!
छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी कोणाची परवानगी हवीच कशाला?
मिराबाई चानू आता उचलणार अतिरिक्त पोलिस अधीक्षकाचा भार
दिल्लीत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक हुडहुडी भरविणारा दिवस
केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित देशभरातील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीटीआयने सांगितले होते की, २१ ऑक्टोबर १९४३ रोजी बोस यांनी जाहीर केलेल्या सरकारच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालय कार्यक्रमांचा भाग म्हणून क्युरेटेड टूरचे नियोजन करत आहे.
“सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या रस्त्यांचा समावेश असेल. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी जोडलेल्या स्मृती स्थळांचा समावेश असणार आहे. नेताजींशी संबंधित स्मृती स्थळांची जगाला ओळख करून देण्यासाठी या योजना आखल्या आहेत,” असे एका अधिकाऱ्याने सांगितल्याचे पीटीआयने म्हटले होते.