नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती आहे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानासाठी नेताजींचे सदैव स्मरण केले जाईल. स्वातंत्र्य चळवळीत ते अनेकदा तुरुंगात गेले, नजरकैदेत होते. सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय विचार, दूरदृष्टी मुळेच देशाची दमदार वाटचाल होत आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत अमूल्य असे योगदान देऊनही त्यांच्या कार्याची दाखल घेतल्या गेली नाही. काँग्रेस सरकारच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनाच महत्व दिले गेले . सरदार वल्लभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाचा संबंध आला तो या व्यक्तींची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करण्यापुरताच.
मोदी सरकारच्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून नेताजींचा सातत्याने सन्मान केला जात आहे. अमृतकाळामध्ये मध्ये विस्मृतीत गेलेल्या अशा वीरांना समोर आणण्याचा सरकारचा सातत्याने प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दात सांगायचे तर कोणत्याही देशाने आपला गौरवशाली भूतकाळ विसरू नये. भारताचा गौरवशाली इतिहास प्रत्येक भारतीयाच्या रक्तात आणि परंपरेत आहे. नेताजींना भारताच्या वारशाचा अभिमान होता आणि त्यांना भारताचे आधुनिकीकरण करायचे होते. भारताने स्वातंत्र्यानंतर सुभाषबाबूंचा मार्ग अवलंबला असता तर त्या काळातच देशाने आणखी वेगळी नसून उंची गाठली असती.
पण स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आपल्या या महान नायकाचे विस्मरण झाले आणि प्रतिकांकडेही दुर्लक्ष करण्यात आले. राजपथचे नाव कर्तव्यपथ करून ब्रिटिश राजवटीच्या कटू आठवणी कायमच्या पुसण्यात आल्या. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे इंडिया गेट जवळ उभारण्यात आलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा. इंडिया गेट १९२० मध्ये पहिल्या महायुद्धाचे स्मारक म्हणून बांधले गेले. किंग्सवे म्हणजे आताच्या कर्तव्य पथावर असलेल्या या स्मारकाची रचना नवी दिल्लीचे मुख्य वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी केली होती. ३ जानेवारी १९४३ रोजी भारत छोडो आंदोलनादरम्यान पुतळ्याची तोडफोड करण्यात आली १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर या पुतळ्याला जोरदार विरोध झाला, मात्र दोन दशके हा पुतळा तसाच होता. त्यानंतर १९६८ मध्ये हा पुतळा कोरोनेशन पार्कमध्ये बसवण्यात आला. आता येथे सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात आला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धानंतर ब्रिटीश साम्राज्यांनी बंडखोरांना अंदमानच्या बेटांवर कैद करून ठेवले होते. सर्व कैद्यांना रास बेटावर ठेवण्यात आले होते. इंग्रज सरकारने या बेटाला अंदमानचे प्रशासकीय मुख्यालय बनवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या तिरंगा फडकवल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त रॉस बेटाचे नाव बदलून सुभाषचंद्र बेट केले. देशातील जनतेला, विशेषत: तरुणांना, विशेषत: तरुणांना, प्रतिकूल परिस्थितीत नेताजींच्या निस्वार्थ सेवेतून प्रेरणा मिळवी आणि त्यांच्यात देशभक्ती आणि धैर्याची भावना जागृत व्हावी यासाठी भारत सरकारने दरवर्षी २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांकडे राजकारण म्हनेऊन टीका करण्यात आली पण त्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. ते आपले काम करत राहतात. त्यांचेच नवीन उदाहरण म्हणजे नवी दिल्लीत बांधण्यात आलेल्या संसदेच्या नव्या सेंट्रल व्हिस्टा इमारतीत होत असलेला सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी केलेली नव्या उपक्रमाची घोषणा..
संसदेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला संसदेच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी आतापर्यंत फक्त निमंत्रितांनाच परवानगी मिळत होती. पण आता बाहेरच्या सामान्य व्यक्तींना देखील प्रवेश मिळणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्यांचे योगदान आणि बलिदान तरुण पिढीने जाणून घेतले पाहिजे या दृष्टीने विचार करून पंतप्रधांनी हा निर्णय घेतला आहे. नेताजींना आदरांजली ८० तरुणांची देशभरातून निवड करण्यात आली असून त्यात ३५ मुली आणि ४५ मुलांचा समावेश आहे. नेताजींच्या जयंतीच्या दिवशी सेंट्रल हॉलमध्ये ८० तरुणांपैकी ३० णांना त्यांच्याविषयी बोलण्यातरुची संधी मिळणार आहे. हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मराठी आणि बंगाली अशा पाच भाषांमधून संवाद साधतील.
अंदमानच्या रॉस बेटाला यापूर्वीच सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नील आयलंड आणि हॅवलॉक आयलंडचे नामकरण शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे करण्यात आले आहे. आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी होणाऱ्या पराक्रम दिनानिमित्त अंदमान आणि निकोबारच्या २१ अज्ञात बेटांना २१ परमवीर चक्राने सन्मानित हुतात्म्यांची नावे देण्यात आली आहेत. सर्वात मोठ्या निनावी बेटाला पहिले वीर चक्र पुरस्कार विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांचे तर दुसऱ्या सर्वात मोठ्या बेटाचे नाव आणखी एक वीरचक्र पुरस्कार विजेते करम सिंग यांचे नाव देण्यात आले आहे.