23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषलहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!

लहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!

पब्लिक आय आणि आयबीएफएएन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Google News Follow

Related

लहान मुलांसाठी पौष्टिक खाऊ बनवणाऱ्या नेस्ले कंपनीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.भारतासह अनेक आफ्रिकी देशांमध्ये लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या नेस्लेचे सेरेलॅक आणि दुधाच्या पावडरमध्ये नेस्ले भेसळ करत असल्याचे एका अहवालात आढळून आले आहे.मात्र, युरोप आणि ब्रिटन सारख्या देशांमध्ये शुद्ध आणि भेसळयुक्त सेरेलॅकची विक्री केली जात असल्याचेही उघड झाले आहे.

पब्लिक आय आणि आयबीएफएएन (इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क) या स्विस तपास संस्थेने सादर केलेल्या रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या दुधात नेस्ले अतिरिक्त साखरेचा वापर करत असल्याचे पब्लिक आय आणि आयबीएफएएन यांच्या अहवालात उघड झाले आहे. नेस्लेच्या निडो आणि सेरेलॅकच्या नमुन्यांमध्ये सुक्रोज किंवा मधाच्या स्वरूपात साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.महत्वाचे म्हणजे, निडो हे एक वर्ष आणि त्याहून अधीक वयाच्या लहान मुलांसाठी दुधाच्या रूपात वापरण्यासाठी आहे, तर सेरेलॅकचा वापर सहा ते दोन वर्षांतील मुलांसाठी केला जातो.

हे ही वाचा:

गुगलने २८ कर्मच्याऱ्याना कामावरून कमी केले

‘मुंबई इंडियन्सबरोबरच गुजरात टायटन्सलाही बुडवले’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आणखी दोन संशयित अटकेत

श्रीलंकन महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास

नेस्ले कंपनीकडून ही भेसळ फक्त आशियाई आणि गरीब आफ्रिकन आणि लॅटिन देशांमध्ये केली जात असून युरोप आणि यूकेमधील त्याच्या मुख्य बाजारपेठांमध्ये ही भेसळ करत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.नेस्लेची दूध पावडर आणि सेरेलॅकचे नमुने बेल्जियमच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले गेले होते.त्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.

भारतामध्ये नेस्लेचा मोठा व्यवसाय आहे.भारतातील २०२२ मध्ये त्यांची उलाढाल ही २५० अमेरिकल डॉलर्स एवढी होती.अशा परिस्थितीत नेस्लेबाबतचा हा अहवाल धक्कादायक मानला जात आहे. अहवालात असे दिसून आले आहे की नेस्लेच्या सर्व सेरेलॅक बेबी उत्पादनांमध्ये सरासरी ३ ग्रॅम अतिरिक्त साखर आहे.
दरम्यान, नेस्लेच्या अहवालानंतर जागतिक आरोग्य संघटनेने देखील संताप व्यक्त केला आहे.त्यांनी सांगितले की, अशी उत्पादने सुरुवातीपासून सहा महिने आणि दोन वर्षांपर्यंत मुलांना दिली जातात. नेस्लेच्या उत्पादनांमध्ये असलेली ही भेसळ लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. या भेसळयुक्त सेरेलॅकमुळे आरोग्यावर मोठा परिमाण होऊ शकतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा