पाकिस्तानमधील भाच्यांची भारतातील मामाशी भेट होणार

आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नांना यश

पाकिस्तानमधील भाच्यांची भारतातील मामाशी भेट होणार

पाकिस्तानच्या कराचीमध्ये असलेल्या आपल्या भाच्यांना भारतात आणण्यासाठी महिनोनमहिने प्रयत्न करणाऱ्या वयोवृद्ध मामाला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नामुळे दिलासा मिळाला आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेला ‘व्हिसा’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेमराज सोनी असे या मामाचे नाव आहे. सोनी हे मालाड पूर्वमध्ये राहतात. त्यांच्या भाच्या गीता आणि रीटा सध्या काराचीमध्ये आहेत.

या दोघींना भारतात आणण्यासाठी त्यांचे मामा हेमराज सोनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. अखेर त्यांनी आमदार अतुल भातखळकर यांची भेट घेतली. आमदार भातखळकर यांनी समस्या समजावून घेतली. आवश्यक ती सर्व प्रशासकीय मदत त्यांनी सोनी यांना केली. त्यानंतर आता सोनी यांच्या भाच्यांना भारतात येण्यासाठी आवश्यक असलेला ‘व्हिसा’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर सोनी यांनी आमदार भातखळकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

हे ही वाचा:

अवैध बांधकाम तोडण्यासाठी हवे तर योगींकडून बुलडोझर उसने घ्या!

मध्य प्रदेशमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

चिन्ह, नावाबाबत ठाकरे हतबल पवार सुशेगात

मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

Exit mobile version