नेपाळमध्ये लँडिंग करताना विमान कोसळून ३० जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये लँडिंग करताना  विमान कोसळून ३० जणांचा मृत्यू

नेपाळची राजधानी काठमांडूमधून मोठी बातमी समोर आली आहे. येती एअरलाईन्सचे विमान पोखरा विमानतळ जवळ कोसळले आहे. या विमानात ७२ प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर उतरताना हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, विमान दुर्घटनेच्या ढिगाऱ्यातून १८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बरेचसे प्रवासी बेपत्ता असून सध्या बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेनंतर विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.

येति एअरलाईन्सच्या एटीआर ७२ जातीच्या विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते. विमान कोसळल्यानंतर लगेचच विमानाला आग लागली. बचाव पथक विमानात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे आणि आग विझवण्याचे कसोशीने प्रयत्न करत आहेत. मृतांचा नेमका आकडा समोर आलेला नाही . खराब हवामानामुळे हे विमान एका डोंगराला जाऊन धडकले. दुर्घटना घडली त्या ठिकाणी सेती नदी आहे . या नदीच्या बाजूच्या दरीत हे विमान पडल्याचे सांगण्यात येत आहे.जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

आतापर्यंत ३० जणांचे मृतदेह बाहेर काढल्याचा दावा केला जात आहे. विमान कंपन्या आणि सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. पोखरा विमानतळावर प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने आपत्कालीन कॅबिनेट बैठक बोलावली आहे. पंतप्रधान पुष्प कल दहल ‘प्रचंड’ यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्करानेही घटनास्थळी पोहोचून जबाबदारी स्वीकारली आहे.मागील वर्षी मे महिन्यात खराब हवामानामुळे पहारी मुस्तांग जिल्ह्यात तारा एअरचे विमान कोसळले होते. या घटनेत २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. खराब हवामानामुळे विमान डावीकडे न जाता उजवीकडे वळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यामुळे विमान डोंगरावर जाऊन कोसळले.
Exit mobile version