डॉ.केशव हेडगेवार यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली!

डॉ.केशव हेडगेवार यांची आज जयंती

डॉ.केशव हेडगेवार यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली!

जगातली सर्वात मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत.१९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी याची स्थापना केली होती आणि ते त्याचे पहिले सरसंघचालकही होते.आरएसएसच्या परिभाषेत त्यांना आद्य सरसंघचालक म्हटले जाते.हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची जयंती देखील साजरी केली जाते.या निमित्ताने संघ अनेकदा शाखांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करतो आणि स्वयंसेवकांना हेडगेवार यांचे जीवन आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाची माहिती सांगितली जाते.

डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांची आज जयंती.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ.केशव हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली.डॉ.हेडगेवार यांना संघात डॉ. साहेब या टोपण नावाने देखील ओळखले जायचे.पेशाने डॉक्टर असलेले केशव बळीराम हेडगेवार हे देखील स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते आणि एकेकाळी काँग्रेसच्या मध्यप्रांताचे अध्यक्ष होते.१८८९ मध्ये डॉ.हेडगेवार यांचा जन्म झाला होता.तर १९४० यामध्ये त्यांचे निधन झाले.परंतु त्यांनी आपल्या ५१ वर्षांच्या अल्पशा आयुष्यात हिंदू राष्ट्राच्या सांस्कृतिक ऐक्यासाठी केलेले प्रयत्न आजही महत्वाचे आहेत.एवढेच नाहीतर आज भाजप आणि संघ परिवाराच्या रूपाने जवळपास प्रत्येक क्षेत्रात एक वैचारिक वटवृक्ष उदयास आला आहे, हे त्यांनी लावलेल्या रोपट्याचे फलित आहे.

 

हे ही वाचा:

प्रेमप्रकरणे, प्रेमविवाहाचे धोके सांगण्यासाठी केरळमध्ये दाखवला ‘द केरळ स्टोरी’

काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’

‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’

दरम्यान, सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून मोहन भागवत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, जे संघाचे सहावे सरसंघचालक आहेत.आरएसएसमध्ये सरसंघचालक हे पद सर्वोच्च आहे.

Exit mobile version