आता नेहरू मेमोरियल नाही, प्राईम मिनिस्टर म्युझियम

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नाव बदलाला केंद्र सरकारकडून मंजुरी

आता नेहरू मेमोरियल नाही, प्राईम मिनिस्टर म्युझियम

दिल्लीच्या तीन मूर्ती भवनवर असलेल्या नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे नाव आता अधिकृतपणे प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी असे करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर या नाव बदलाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली.

पीएम संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष ए. सूर्य प्रकाश यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे. “नेहरु मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी (NMML) १४ ऑगस्ट २०२३ पासून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) सोसायटी आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!” तसेच ए. सूर्यप्रकाश यांनी सांगितले की, नामांतराची प्रक्रिया जूनमध्ये सुरु झाली आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे काम पूर्ण झालं हा निव्वळ योगायोग आहे.

जून २०२३ मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर आता अधिकृतरित्या शिक्कमोर्तब करण्यात आले आहे.

नेहरु मेमोरियल म्यूझियमच्या नाव बदलाला काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. या संस्थेचे नाव स्वतंत्र भारतातील लोकशाहीचा एकत्रित प्रवास आणि राष्ट्र उभारणीत प्रत्येक पंतप्रधानाचे असलेले योगदान दर्शवणाऱ्या नवीन संग्रहालयासह, चालू उपक्रमांचे प्रतिबिंब असावं, असं पीएम म्युझियम अँड लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेला वाटत होतं. त्यानंतर नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!

अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांकडून गोंधळ !

हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !

माजी पंतप्रधान नेहरु यांचे शासकीय निवासस्थान १९२९- ३० दरम्यान बांधलेलं. तीन मूर्ती हाऊस यापूर्वी भारतातील कमांडर इन चीफचे अधिकृत निवासस्थान होते. स्वातंत्र्यानंतर ते तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे अधिकृत निवासस्थान बनले. नेहरु नेहरूंच्या निधनानंतर सरकारने नेहरुंना समर्पित या इमारतीत संग्रहालय आणि ग्रंथालय बांधण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर नेहरु मेमोरियल म्युझियमचे उद्घाटन करुन एनएमएमएल सोसायटीची स्थापना करण्यात आली होती.

Exit mobile version