आता नेहरू मेमोरियल नाही; पंतप्रधान मेमोरियल

NMML च्या कार्यकारी परिषदेने नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या १६२ व्या बैठकीत तीन मूर्ती इस्टेटमध्ये सर्व पंतप्रधानांचे संग्रहालय बांधण्यास मान्यता दिली होती.

आता नेहरू मेमोरियल नाही; पंतप्रधान मेमोरियल

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने असलेल्या नेहरू संग्रहालय मेमोरियल अँड लायब्ररीचे नाव आता बदलण्यात आले असून ते आता पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे करण्यात आले आहे. NMML असलेल्या ऐतिहासिक तीन मूर्ती संकुलात वर्षभरापूर्वी ‘पंतप्रधान संग्रहालयाचे’ उद्घाटन झाले होते. त्यानंतर काल हे नामांतर झाले आहे. नामांतराचा निर्णय नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) सोसायटीच्या विशेष बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, जे या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत, असे सांस्कृतिक मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की NMML कार्यकारी मंडळाला असे वाटते की स्वतंत्र भारतातील लोकशाहीच्या आजवरच्या प्रवासाचे यथोचित वर्णन आणि राष्ट्र उभारणीत वाटा असलेल्या प्रत्येक पंतप्रधानाच्या योगदानावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. सर्व माजी आणि दिवंगत पंतप्रधानांना समर्पित संग्रहालयाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये मांडली होती.

हे ही वाचा:

चक्रीवादळ व्यवस्थापनात ओदिशा ठरलेय ‘रोल मॉडेल’

कांदिवलीच्या शाळेत लावली अजान, एक शिक्षिका निलंबित

शीतल कारुळकर यांना नालंदा नृत्य कला महाविद्यालय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदाचा बहुमान

मणिपूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला

त्यानंतर, NMML च्या कार्यकारी परिषदेने नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या १६२ व्या बैठकीत तीन मूर्ती इस्टेटमध्ये सर्व पंतप्रधानांचे संग्रहालय बांधण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार या प्रकल्पाचे काम सुरु होऊन २१ एप्रिल २०२२ रोजी ‘प्रधानमंत्री संग्रहालय’ लोकांसाठी खुले करण्यात आले.

गुरुवारी झालेल्या सोसायटीच्या बैठकीत NMML कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी पंतप्रधानांचे संग्रहालय देशाची लोकशाहीप्रती असलेली दृढ बांधिलकी व्यक्त करते आणि त्यामुळे संस्थेचे नाव नव्या स्वरूपात प्रतिबिंबित झाले पाहिजे, असे प्रतिपादन करून नाव बदलण्याची गरज स्पष्ट केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नाव बदलण्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले कारण संस्थेच्या नवीन स्वरूपात जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे योगदान आणि त्यांच्यासमोरील विविध आव्हानांना त्यांनी दिलेले प्रतिसाद प्रदर्शित केले आहेत.

सिंह यांनी भारताचे पंतप्रधान पद ही एक संस्था म्हणून कार्य करते असे वर्णन केले आणि विविध पंतप्रधानांच्या प्रवासाची तुलना इंद्रधनुष्याच्या विविध रंगांशी केली. इंद्रधनुष्याचे सर्व रंग ते सुंदर बनवण्यासाठी प्रमाणानुसार दाखवावे लागतात. अशा प्रकारे या ठरावाला नवीन नाव देण्यात आले आहे. आमच्या सर्व पूर्व पंतप्रधानांबद्दल आम्हाला आदर आहे आणि ते लोकशाहीवादी आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.   नवीन इमारतीत असलेल्या पंतप्रधान संग्रहालय आपल्या आजवरच्या सर्व पंतप्रधानांनी विविध आव्हानांमधून कसे मार्गक्रमण केले आणि देशाची सर्वांगीण प्रगती कशी केली याची कथा सांगते. हे संग्रहालय सर्व पंतप्रधानांची महती विशद करून एकप्रकारे या संस्थेचे लोकशाहीकरण मजबूत करते, असेच म्हटले पाहिजे.

Exit mobile version