उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहणाऱ्या मुस्लिम समाजातील एका मुलीने हिंदू धर्म स्वीकारला आहे. धर्म बदलून ती अस्मत अलीपासून नेहा सिंग बनली आहे. अस्मत अलीमधून नेहा बनलेल्या मुलीने सांगितले की, तिहेरी तलाक, हलाला (दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न लावून देणे) अशा गोष्टींच्या भीतीने मी सनातन धर्म स्वीकारला आहे.मात्र, मी हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे माझे कुटुंबीय संतप्त झाले आहेत.त्यामुळे कुटुंबीयांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत नेहा सिंगने प्रशासन आणि पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
नेहा ही ठाणे (अस्मत) जिल्ह्यातील बारादरी भागातील रहिवासी आहे. ती व्यवसायाने शिक्षिका आहे. ती म्हणाली की, मी सुरवातीपासूनच भगवान शंकराला मानते.मी महाकालाच्या दरबारातही गेले आहे. माझ्या कुटुंबीयाने नुकतीच माझी अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली होती.त्यांनतर नेहाने पुढे येऊन सर्व हकीकत सांगितली.
नेहा पुढे म्हणाली की, मी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे.माझ्या वडिलांचे नाव असगर अली असून ते बियाणे विकास महामंडळात लेखापाल म्हणून काम करत होते.ते आता या जगात नाहीयेत.मला सुरवातीपासूनच सनातन धर्माची आवडी होती, असे नेहाने सांगितले.नेहाने बरेली कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर ती सध्या बीएडचे शिक्षण घेत आहे.त्याचबरोबर ती शिकवण्याचे कामही करत आहे.
हे ही वाचा:
छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न
पुण्याच्या मनपा क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करणार
‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार
नेहाने सांगितले की, तिची बहीण, भावजय आणि आई तिचे लग्न एका व्यक्तीशी करणार होते, जो व्यक्ती आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिचे लग्न लावून दिले होते.घरच्यांचा इतका वाईट निर्णय मला मान्य नव्हता. मी याला विरोध केला असता माझ्या कुटुंबीयांनी माझ्यावर विनाकारण दबाव टाकण्यास सुरुवात केली. शेवटी मी स्वेच्छेने घर सोडले आणि इस्लामचा त्याग केला आणि वैदिक चालीरीतींचे पालन करून सनातन धर्म स्वीकारला, ती पुढे म्हणाली.
नेहाच्या म्हणण्यानुसार, तिने धर्म सोडल्याने कुटुंबीय नाराज आहेत. कटाचा एक भाग म्हणून त्यांनी बरेलीच्या बारादरी पोलीस ठाण्यात माझा सहकारी मोहित सिंग याच्याविरुद्ध अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली. तर अपहरणाच्या कथेत अजिबात तथ्य नाहीये. मी माझ्या स्वेच्छेने घर सोडले आहे. ती पुढे म्हणाली की, कोणाच्याही दबावाशिवाय मी स्वतः सनातन धर्म स्वीकारला आहे.
नेहाने असेही सांगितले की, तिला तिच्या कुटुंबीयांकडून तिच्या जीवाला धोका आहे. नेहाने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह बरेलीच्या डीएम आणि एसएसपींना पत्र पाठवून तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेची विनंती केली आहे. सुरक्षेबाबत तिला काही अडचण आल्यास याला तिचे कुटुंबीय जबाबदार असतील, असेही तिने सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी क्षेत्र अधिकारी अनिता चौहान यांनी सांगितले की, मुलीच्या आईच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.