मुंबईत सध्या खराब रस्त्यांमुळे वाहन अपघात वाढत आहेत. तसेच बेस्ट बसेस चालकांकडून अनावधाने मारलेल्या ब्रेकमुळे प्रवासी बसमध्येच धडकतात. अशा घटना यापूर्वीही घडलेल्या असून, त्यामुळे प्रवाशांना ईजा झाल्याचंही समोर आले त्यानंतर अशीच एक घटना बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यासोबत घडली आहे. सुरेंद्र शिंदे (५९) असे त्यांचे नाव असून, बसमध्ये चढताना तुटलेल्या पत्र्यात त्यांचा पाय अडकला आणि त्यांचा पाय कापला गेला. आता १८ नोव्हेंबरला या घटनेला १ महिना पूर्ण होईल.मात्र बेस्ट प्रशासनाने त्यांची भेट घेण्याची संवेदनशीलता ही दाखवली नाही, असा संताप शिंदे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
या अपघाताबद्दल सुरेंद्र यांचे भाऊ संतोष शिंदे यांनी या संदर्भात फेरतपासणीसाठी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच अपघातासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्टच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष शिंदे यांनी पोलिस ठाण्यात केली. संबंधित घटना ही १८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या वेळेस ही घटना शिवडी येथे घडली. सुरेंद्र शिंदे हे बस मध्ये चढत असताना हा अपघात झाला. बस मार्ग क्रमांक ४५ बस क्रमांक एमएच ०१ सीआर ३५०५ बॅकबे रेक्लेमेशन या आगारातील बसच्या मागील दरवाज्याचा पत्रा फाटला होता.
हे ही वाचा:
कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांनी केली ‘पहिली’ शिकार
टीम इंडियाने गोलंदाजांसाठी सोडल्या बिझनेस क्लास सीट्स
सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…
चार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड
या पत्र्यामध्ये सुरेंद्र यांचा डावा पाय अडकला होता. त्याचवेळी बस चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे चाकाच्या वरच्या भागामधील पत्रा फाटून पोकळीमध्ये पाय अडकून संपूर्ण पाय कापला गेला. ही घटना समजताच पोलिसांनी तातडीने केईएम रुग्णालयात सुरेंद्र यांना दाखल केले. व त्यानंतर गंभीर दुखापतीमुळे डावा पाय गुडघ्याच्या खाली कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही बस २०१९ मध्ये प्रवासी वाहतुकीसाठी वैध होती. तर बेस्टची बस सुरक्षित नसल्याने ती वापरात का आणली असा प्रश्न संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे.