लालसिंह चढ्ढा कोसळला

लालसिंह चढ्ढा कोसळला

बहिष्काराचे आवाहन करण्यात आलेला लाल सिंह चढ्ढा पहिल्याच दिवशी सपाटून आपटला. ओस पडलेली थिएटर, प्रमुख समीक्षकांनी दर्शविलेली नापसंती, सोशल मीडियावर लोकांनी दाखवलेली नाराजी असेच वातावरण सगळीकडे दिसत होते. आमीर खानची भूमिका असलेल्या या सिनेमाकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली. भारतात असुरक्षित वाटत असल्याची भूमिका, हिंदू देवतांबद्दल आपल्या चित्रपटात उडविलेली टिंगल हे आमिरच्या चांगलेच अंगलट आले आहे.

लाल सिंह चढ्ढा हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ चा हिंदी रिमेक आहे. यात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होता. तर आमिर खानच्या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर आणि मोना सिंह मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता प्रदर्शित झाल्यानंतर ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पहिला आहे त्यांचा हिरमोड झाला आहे.

आमिर खानने या चित्रपटात अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे आणि टॉम हँक्सने साकारलेल्या फॉरेस्ट गंपचे पात्र लाल सिंगच्या रुपांतरात ‘मंदबुद्धी’ व्यक्तीसारखे दिसले असल्याचा उल्लेख इंडिया टुडेने केला आहे. चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये आमिर खानच्या खराब अभिनयाचा उल्लेख केला आहे. या चित्रपटातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आमिर खानचा अभिनय असाही उल्लेख इंडिया टुडेने केला आहे.

प्रख्यात चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी लाल सिंह चढ्ढा या सिनेमा ‘निराशाजनक’ असल्याचे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटाला फक्त दोन स्टार दिले आहेत. नेटकऱ्यांनी आमिर खानला दयनीय ओव्हरऍक्टिंगबद्दल सोशल मीडियावर फटकारले आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरही आमिर खानच्या अभिनयावर बरीच टीका झाली होती. चित्रपटाचे बुकिंगच झालेले नाही, आमिर खानचा अखेरचा यशस्वी सिनेमा २०१६ ला आला होता, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रेक्षक देत आहेत.

 

Exit mobile version