‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’

पत्रकार परिषदेत शिक्षण मंत्र्यांची माहिती

‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’

नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकाराबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. प्रधान यांनी नीट परीक्षेसह यूजीसी नेट परीक्षा रद्द होणे आणि विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिले. यूजीसी नेट परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर फुटली होती, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, ‘आपण आपल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सरकार कोणतीही अनियमितता किंवा चुकीचे वर्तन सहन करणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मी सर्वांना आश्वस्त करतो की, सरकारच्या विद्यार्थ्यांच्या हिताला सुरक्षित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पारदर्शकतेत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. विद्यार्थ्यांच्या हिताला आमचे प्राधान्य आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी तडजोड होऊ शकत नाही. नीट परीक्षेच्या संदर्भात आम्ही सातत्याने बिहार सरकारच्या संपर्कात आहोत. पाटण्यावरून आम्हाला काही माहितीही मिळते आहे. आजही काही चर्चा झाली आहे. पाटणा पोलिस याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडेही काही माहिती आली आहे. विस्तृत अहवाल लवकरच ते भारत सरकारला पाठवतील,’ अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

हे ही वाचा..

राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी!

जगभरातील सर्वांत उंच पुलावरून धावली रेल्वे!

सातवेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब लोकसभेचे नवे हंगामी अध्यक्ष

दोषींविरोधात कठोर कारवाई
ठोस माहिती येताच, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रधान यांनी दिली. एनटीए असू दे की एनटीएची कोणतीही व्यक्ती. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, या प्रकरणी सरकार उच्चस्तरीय समितीची स्थापना करणार आहे. एनटीएची रचना, त्याची कार्यपद्धती, परीक्षेची प्रक्रिया, पारदर्शकता आणि माहितीसाठा सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी ही समिती शिफारशी सादर करेल, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version