‘सुवर्ण’ कामगिरी नंतर नीरज चोप्राच्या ‘त्या’ कृतीने जिंकली मने!

 नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव

‘सुवर्ण’ कामगिरी नंतर नीरज चोप्राच्या ‘त्या’ कृतीने जिंकली मने!

भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ अशी ओळख असलेला नीरज चोप्रा याने ‘जागतिक भालाफेक स्पर्धेत’ सुवर्ण पदकाला गवसणी घातली. नीरज चोप्रा हा ‘जागतिक भालाफेक स्पर्धे’त सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय भालाफेटपटू ठरला आहे. यानंतर साऱ्या भारतीयांच्या मान अभिमानाने उंचावलेल्या असताना नीरजने स्पर्धेनंतर त्याच्या कृतीने सर्वांचीच मनं जिंकली.

नीरज चोप्राने ८८.१७ मीटर भालाफेक करत इतिहास रचला. स्पर्धा जिंकल्यानंतर भारताच्या या खेळाडूची सही घ्यावी म्हणून एक चाहती हातात तिरंगा घेऊन त्याच्याकडे आली. तेव्हा राष्ट्रध्वजावरच ती नीरजची सही मागू लागली. पण, क्षणाचाही विलंब न करता नीरजने तिला स्पष्ट नकार दिला. शिवाय चाह्तीचे मन जपून त्याने चाहतीने घातलेल्या टीशर्टच्या बाहीवर सही दिली. नीरजच्या या कृत्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

नीरजने घेतलेल्या या निर्णयाचे आणि त्याच्या देशभक्तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एका पत्रकाराने नीरजच्या या अभिमानास्पद कृत्याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. पत्रकारानं ट्वीटमध्ये म्हटलंय की, “एक हंगेरियन महिलेला नीरज चोप्राचा ऑटोग्राफ हवा होता. नीरजनंही तिला होकार दिला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की, महिलेला भारताच्या राष्ट्रध्वजावर ऑटोग्राफ हवा आहे. नीरजनं क्षणाचाही विलंब न लावता, “मी तिथे ऑटोग्राफ करू शकत नाही” असं स्पष्ट सांगितलं. शेवटी, नीरजनं तिच्या शर्टच्या बाहीवर ऑटोग्राफ दिला. ती हंगेरियन महिलाही खूप आनंदी होती.”

हे ही वाचा:

“‘मातोश्री’च्या निकटवर्तीयाकडून नितीन देसाईंना धमक्या”

चांद्रयान ३ ने मातीचे पहिले परीक्षण नोंदविले

सातारामधील आश्रमशाळेतील १७० मुलांना विषबाधा

पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या जागतिक भालाफेक स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून दिले. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. २०२० साली नीरजने ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती.

Exit mobile version