ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लुसाने डायमंड लीग २०२२ मध्ये नीरज शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय ठरला आहे. या विजयानंतर नीरज वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ साठीही पात्र ठरला आहे.
नीरजने पहिलाच थ्रो ८९.०८ मीटरचा केला आणि स्पर्धा अधिक आव्हानात्मक बनवली. पुढे नीरजने ८०.०४ मीटरचे लक्ष्य गाठून विजय मिळवला. तर टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जेकब वडलेजने ८५.८८ मीटरचा थ्रो करून दुसरे स्थान मिळवले तर यूएसएच्या कर्टिस थॉम्पसनने ८३.७२ मीटर थ्रो करत तिसरे स्थान पटकावले आहे. नीरज चोप्रा डायमंड लीगचा मुकुट जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. तर वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ मध्येही नीरज आता उत्कृष्ट कामगिरी करायला सज्ज असणार आहे.
डायमंड लीगमधील नीरजची कामगिरी
- पहिला थ्रो- ८९.०८ मीटर
- दुसरा थ्रो- ८५.१८ मीटर
- तिसरा थ्रो- थ्रो केला नाही
- चौथा थ्रो- फाउल
- पाचवा थ्रो- थ्रो केला नाही
- सहावा प्रयत्न- ८०.०४ मीटर
HE'S DONE IT!🇮🇳
IIS athlete #NeerajChopra becomes the FIRST EVER Indian to win at the Diamond League, finishing top of the pile at the #LausanneDL with a MASSIVE throw of 89.08m in his very first attempt⚡️
He qualifies for the Diamond League final, in Zurich. #CraftingVictories pic.twitter.com/zbxbqrlWnD
— Inspire Institute of Sport (@IIS_Vijayanagar) August 26, 2022
हे ही वाचा:
‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट
मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण
‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन
काही दिवसांपूर्वी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राच्या पाठीला दुखापत झाली होती. या स्पर्धेत त्याने रौप्यपदकावर नाव कोरले होते. पुढे त्याने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. तर त्यापूर्वी नीरजने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते.