‘राष्ट्रकुल स्पर्धा २०२२’ ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भालाफेकीत भारताचे पदक निश्चित असण्याची अपेक्षा असताना आता भारताला धक्का बसला आहे. दुखापतीमुळे नीरज चोप्रा या स्पर्धेला मुकणार आहे. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने रौप्यपदक कमावत इतिहास रचला होता आणि नुकत्याच झालेल्या ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान नीरजला दुखापत झाली होती.
नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राच्या पायला दुखापत झाली होती. चौथ्या थ्रो दरम्यान नीरजला दुखापतीची जाणीव झाली होती. मात्र, आता तपासणीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार दुखापत मोठी असून नीरज राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाही. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर नीरजचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. त्यात त्याला ग्रोइन इन्जुरी झाल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर नीरजला महिनाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”
सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला
विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत
मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक हुकल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कमाई करायची यावर नीरजची नजर असणार होती. भारतालाही नीरजकडून अपेक्षा होती. नीरज आणि वर्ल्ड चॅम्पियनमध्ये सुवर्णपदक कमावणारा पीटर्स आमने- सामने येणार होते. त्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष होते.