जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे साऱ्या देशाचं लक्ष होतं. या स्पर्धेतही भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचत रौप्यपदकाळा गवसणी घातली आहे. जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ नीरज चोप्राने संपवला आहे.
नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला. दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८२.३९ मीटर भाला फेकत खेळात वापसी केली. तर नीरज चोप्रानं तिसऱ्या प्रयत्नात ८६.३७ मीटर भाला फेकला आणि या प्रयत्नात नीरज पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी आला. त्यानंतर चौथ्या प्रयत्नानंतर तो दुसऱ्या स्थानी आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर ८८.१३ मीटर्सवर भाला फेकला. या स्पर्धेत ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सन याने सुवर्णपदक जिंकलं आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर भाला फेकला.
हे ही वाचा:
मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी
नीरज चोप्राने मिळवलेल्या पदकामुळे भारताचा जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला आहे. भारताला गेल्या १९ वर्षांत जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये पदक मिळवता आलेलं नव्हतं. २००३ मध्ये जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं.