ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू ऍथलिट नीरज चोप्रा याने पावो नूरमी स्पर्धेत शानदार कामगिरी करून विजय मिळवला. नीरजने या स्पर्धेत ८५.९७ मीटरची सर्वोत्कृष्ट भालेफेक करून पहिले स्थान मिळवून सुवर्णपदक मिळवले. फिनलँडचा टोनी केरानेन ८४.१९ मीटर अंतर गाठून दुसऱ्या स्थानी राहिला. तर, ओलिवियर हेलांडर ८३.९६ मीटर अंतर गाठून ब्राँझ पटकावले.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेआधी नीरजने सुवर्णपदक जिंकण्याचा आपला आत्मविश्वास सार्थ असल्याचे या स्पर्धेतून दाखवून दिले. नीरज चोप्रा पहिल्यांदा भालाफेक करण्यास आला आणि त्याने पहिल्याच वेळी ८३.६२ मीटर अंतरावर भालेफेक केली. तर, दुसऱ्या प्रयत्नात नीरजने ८३.४५ मीटरचे अंतर गाठले. त्यानंतर नीरज मागे पडला होता. त्यानंतर नीरजने तिसऱ्या प्रयत्नांत जोरदार पुनरागमन करून ८५.९७ मीटर अंतरावर भाला फेकला. नीरजची हा सर्वोत्कृष्ट फेक ठरली. ८५ मीटरचे अंतर गाठणाऱ्या आठ भालाफेक ऍथलीटमधील नीरज हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
हे ही वाचा..
सुंजवान आर्मी कॅम्प दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अमीर हमजाची पाकिस्तानात हत्या
भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची लवकरच घोषणा
‘मोदीजी धमक्यांना घाबरणार नाहीत’
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!
नीरजने चौथ्या प्रयत्नात ८२.२१ मीटर अंतर गाठले. हे नीरजने गाठलेले सर्वांत कमी अंतर होते. मात्र त्यामुळे त्यांनी घेतलेल्या आघाडीमध्ये फरकपडला नाही. कारण अन्य ऍथलीटची कामगिरी त्यांच्या जवळपासही नव्हती. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला. मात्र अन्य कोणाही ऍथलीटने चांगली कामगिरी न केल्याने फरक पडला नाही. पाचव्या प्रयत्नांनंतरही नीरजचे वर्चस्व कायम होते आणि त्याने सुवर्णपदक पटकावले.