भारताचा भालाफेक स्टार नीरज चोप्राचा शनिवारी (१४ सप्टेंबर) डायमंड लीगचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेत नीरज सुवर्ण पदकापासून थोडक्यात हुकला आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सुवर्ण पदक हुकल्याने नीरजच्या चाहत्यांची निराशा झाली. याच दरम्यान, नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम सामन्याबाबत मोठा खुलासा केला आहे. हात मोडलेल्या स्वरुपात असताना स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्याचे नीरज चोप्राने सांगितले आहे.
नुकतेच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्राने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले होते. या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्षद नदीमने सुवर्ण मारले होते. दरम्यान, डायमंड लीगचा अंतिम सामना शनिवारी (१४ सप्टेंबर) ब्रुसेल्समध्ये पार पडला. यावेळी नीरजने उत्तम कामगिरी केली मात्र, सुवर्ण पदक हुकले आणि रौप्य पदक हाती आले. या स्पर्धेत ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसनने सुवर्ण जिंकले. नीरजने अंतिम फेरीत ८७.८६ मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला आणि ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसनने ८७.८७ मीटर भाला फेकला. नीरज चोप्रा केवळ फक्त एक सेंटीमीटरने सुवर्णपदक जिंकण्यापासून मुकला.
या सामन्याबाबत नीरज चोप्राने मोठा खुलासा करत सामन्यापूर्वी सरावा दरम्यान हाताला दुखापत सांगितले. नीरजने सोशल मीडियावर आपल्या डाव्या हाताची एक्स-रे प्रतिमा शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याच्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे दिसत आहे. हे अत्यंत वेदनादायी होते, मात्र डॉक्टर आणि माझ्या टीमच्या मदतीने अंतिम सामना खेळण्यात यशस्वी ठरलो, असे नीरजने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा :
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी
बांगलादेशी, रोहिंग्यांच्या पाठीशी झारखंड मुक्ती मोर्चा
मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाने बोगस अटकेच्या नोटीस
‘हिजाब-बुरखा’ घाला नाहीतर बांगलादेश सोडा !