टोकियो ऑलिम्पिक 2020-21 मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने आता दीर्घ विश्रांतीनंतर प्रशिक्षण सुरू केले आहे. ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज एनआयएस-पटियाला येथे प्रशिक्षणासाठी परतला आहे. 7 ऑगस्ट रोजी टोकियोमध्ये ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याने काही काळ ब्रेक घेतला होता. अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आणि टोकियोमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला होता. काही दिवसांच्या सुट्टीनंतर नीरज पुन्हा आता सरासावासाठी सज्ज झालेला दिसत आहे. सोशल मीडीयावर नीरजचे चाहतेही मोठ्या प्रमाणावर आहेत.
नुकतेच नीरजने त्याच्या प्रशिक्षणाची काही छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना नीरजने लिहिले, “मी या आठवड्यात त्याच क्षमतेने प्रशिक्षणासाठी परत आलो आहे. याआधी जिंकण्याची जी भूक होती, तिच आताही आहे अशा आशयाचं त्याने ट्विट केलेले आहे. सर्व प्रेक्षकांचे त्याने यावेळी आभारही मानले आहेत. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२०-21 मध्ये भालाफेक मध्ये सुवर्णपदक जिंकले. यासह, अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज भारताचा दुसरा खेळाडू आहे. नीरजच्या आधी अभिनव बिंद्राने 13 वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अवघ्या एका रात्रीत नीरजला गोल्डन बाॅय ही उपाधी मिळाली होती. नीरजने त्याच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशाला गौरवान्वित केले होते.
हे ही वाचा:
आर्यन खानचा ३० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास निश्चित
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट
पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले
सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड
नीरज चोप्रा हा पानिपत, हरियाणाचा रहिवासी आहे. नीरज चोप्रा हा भाला फेकणाऱ्या स्पर्धेत भाग घेणारा भारतीय ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे. अंजू बॉबी जॉर्ज नंतर जागतिक चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे.