23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषभारताचा ऑलिम्पिक सुवर्णवीर नीरज चोप्रा भालाफेकीत जगात पहिल्यांदा ठरला अव्वल

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णवीर नीरज चोप्रा भालाफेकीत जगात पहिल्यांदा ठरला अव्वल

Google News Follow

Related

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. नीरज १४५५ गुणांसह अव्वल ठरला असून त्याने ग्रॅनाडाच्या जगज्जेता अँडरसन पीटर्स (१४३३) पेक्षा २२ गुणांची आघाडी घेतली. यासह जागतिक ऍथलेटिक्समध्ये पहिल्या स्थानी विराजमान होणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्यामुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जागतिक ऍथलेटिक्सने सोमवारी नवी क्रमवारी जाहीर केली. त्यात नीरजला १४५५ गुणांसह अव्वल ठरला. दुसऱ्या क्रमांकावर ग्रॅनाडाच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सला १४३३ गुण, तिसऱ्या क्रमांकावर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेज १४१६ गुण, चौथ्या क्रमांकावर जर्मनीचा ज्युलियन वेबर १३८५ गुण, तर पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा अर्शद नदीम असून त्याला १३०६ गुण आहेत.

हे ही वाचा:

ते हेरॉइन नव्हते होती फक्त पावडर! पण भोगली २० वर्षे शिक्षा

दिल्लीमध्ये आणखी दोन दिवस उष्म्याचा कहर, तापमान अर्धशतकाकडे!

विजय माने यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न

सात तासांच्या चौकशीनंतरही जयंत पाटील ईडीच्या कार्यालयातच

नीरजच्या आगामी स्पर्धा

नीरज आपल्या २०२३ च्या हंगामाची सुरुवात दोहा येथे झालेल्या डायमंड लीग चॅम्पियन बनून केली होती. या स्पर्धेत त्याने विक्रमी ८८.६७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. आता नीरजला त्याची पुढची स्पर्धा नेदरलँड्सच्या हेंगलो येथे खेळायची आहे. ही स्पर्धा फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्स असून ती ४ जूनपासून सुरू होईल. यानंतर नीरजला १३ जून रोजी फिनलंडमधील तुर्कू येथे होणाऱ्या पावो नुर्मी गेम्समध्ये आपले कौशल्य दाखवायचे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा