नीरज चोप्राला ‘वर्ल्ड ऍथलिट ऑफ दी इअर’ पुरस्कारासाठी नामांकन

भारतीय खेळाडूला प्रथमच या पुरस्कारासाठी नामांकन

नीरज चोप्राला ‘वर्ल्ड ऍथलिट ऑफ दी इअर’ पुरस्कारासाठी नामांकन

ऑलिंपिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताला अनेक स्पर्धांमध्ये पदके मिळवून दिली आहेत. त्यानंतर नीरज चोप्रा याला यंदाच्या ‘वर्ल्ड ऍथलिट ऑफ दी इअर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे भारतीय खेळाडूला प्रथमच या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. नीरजसोबत अन्य दहा जणांना नामांकन मिळाले असून ११ डिसेंबरला जागतिक ऍथलेटिक्स विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

ऍथलेटिक्समधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या चमूने जगभरातून एकूण ११ खेळाडूंची निवड केली आहे. यासाठी मतदान होणार आहे. तीन पद्धतीने केलेल्या मतदानाच्या आधारावर विजेत्याची निवड होईल. जागतिक ऍथलेटिक्स परिषद आणि जागतिक ऍथलेटिक्स फॅमिली आपले मत ई-मेलद्वारे देतील. तर, या खेळाडूंचे चाहते आपले मत जागतिक ऍथलेटिक्सच्या सोशल मीडियावर नोंदवतील.

जागतिक ऍथलेटिक्स परिषदेच्या सदस्यांच्या मताला ५० टक्के वजन आहे. तर, इतर मताला प्रत्येकी २५ टक्के वजन देण्यात आले आहे. २८ ऑक्टोबरला मतदान बंद होणार आहे. त्यानंतर ११ पैकी अंतिम पाच विजेत्यांची नावे १३ आणि १४ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येतील.

हे ही वाचा:

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

२०२४ साठी काँग्रेसचे फोडा आणि सत्ता ओढा धोरण…

शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत

इतर नामांकने

रायन क्रुझर (गोळाफेक-अमेरिका), मोंडो डुप्लांतिस (पोल व्हॉल्ट-स्वीडन), सौफीन बकाली (३००० मीटर स्टीपलचेस – मोरोक्को), जेकब इंगेब्रिग्स्टन (१५००, ५०००- नॉर्वे), केल्विन किप्टुम (मॅरेथॉन-केनिया), पियर्स लेपागे (डेकॅथलॉन – कॅनडा), नोह लेलेस (१००, २००- अमेरिका), अल्वारो मार्टिन (३५ आणि २० कि.मी. चालणे- स्पेन), मिल्टिडिअस टेंटोग्लू (लांब उडी – ग्रीस), कार्स्टन वारहोम (४०० हर्डल्स- नॉर्वे).

Exit mobile version