‘आता भालाफेकीत भारताचीच मक्तेदारी’

नीरज चोप्रा याचा विश्वास

‘आता भालाफेकीत भारताचीच मक्तेदारी’

भारताचा अग्रगण्य भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यात गुणवत्ता ठासून भरली आहे, यात शंकाच नाही. मात्र त्यातल एका गुणाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आत्मसंयम. त्यामुळे त्याच्यावर प्रसारमाध्यमे प्रश्नांची सरबत्ती करतात, तेव्हा तो सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देतो. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे ‘तू ९०मीटरच्या पार लक्ष्य कधी गाठणार?’ या प्रश्नाचेही तो शांतपणे उत्तर देतो. ‘खरे तर मलाही हा नव्वदीचा प्रश्न कायमचा संपवून टाकायचाय. मी हे साध्य करू शकलो नाही, याबद्दल क्षमस्व. तुम्हाला मी आणखी एकदा हा प्रश्न विचारण्याची संधी देतो आहे,’ असे नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संदर्भात सांगितले.

 

आशियाई गेम्समध्ये भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रासह आणखी एका भारतीयाने स्वतःकडे तमाम भारतीयांचे लक्ष्य वेधले. किशोर जेना या भालाफेकपटूने स्वतःचाच विक्रम मोडण्याची कामगिरी दोनदा करून या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे भालाफेकीमध्ये भारत एक उगवती शक्ती म्हणून उदयास येत आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. महिनाभरापूर्वी नीरज, जेना आणि डी. पी मानू यांनी बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्या सहामध्ये स्थान मिळवले होते. ‘जर्मन, चेक प्रजासत्ताक आणि फिनलंड या देशांची ज्याप्रमाणे भालेफेकीमध्ये मक्तेदारी आहे, त्याप्रमाणे भारतातही तीन-चार जागतिक दर्जाचे भालाफेकपटू निर्माण व्हावेत, त्यांनीही मोठ्या स्पर्धांमधून देशासाठी पदके मिळवावीत, हे स्वप्न मी नेहमीच पाहिले आहे. आता मात्र भारताने भालाफेकीमध्ये मक्तेदारी निर्माण केल्यामुळे मी खूप खूष आहे,’ असे नीरजने सांगितले. ‘एरवी पोडियमवर मी एकमेव भारतीय असतो. मात्र आशियाई गेम्समध्ये माझ्यासोबत किशोरही होता. त्यामुळे मला खूप आनंद वाटला. भविष्यात पोडियमवर आम्ही तिघेही भारतीय असू. त्याची एक वेगळीच मजा असेल,’ असे नीरज म्हणतो.

हे ही वाचा:

दादा भुसेंकडून संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला!

वायुसेनेचा विजय असो!

‘अमेरिका सदैव इस्रायलच्या पाठिशी’!

अबब! खात्यात जमा झाले ७५३ कोटी!

 

‘सन २०१८पासून मी ९०मीटरचे लक्ष्य पार करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या वर्षी आशियाई गेम्समध्ये मी ८८.०६ मीटरचे लक्ष्य गाठले होते. मात्र मला सन २०१९मध्ये दुखापत झाली. त्यानंतर करोना आला. मी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलो. सन २०२१मध्येही मी चांगली तयारी केली होती. सन २०२२ आणि २३मध्ये मी ८८ आणि ८९चे लक्ष्य गाठले. ९० मीटरचे लक्ष्य कठीण नाही. मी त्याच्या जवळचे लक्ष्य गाठू शकतो आहे. मी ९०च्या पलीकडेही जाऊ शकतो. कदाचित मी ९२ मीटर किंवा ९३ मीटरचेही लक्ष्य गाठेन. आता मी एका विशिष्ट अंकावर टिकून आहे. माझे मुख्य लक्ष्य ९० मीटरचे अंतर पार करण्याचे आहे आणि ते सातत्य टिकवण्यावर आहे, असे नीरज सांगतो.

Exit mobile version