‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’

रौप्य पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदींनी देखील नीरजचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत, ‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’ असल्याचे म्हटले आहे. पॅरिस ऑलम्पिकमध्ये नीरजने ८९.४५ मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले. तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला (८८.५४ मीटर) कांस्यपदक मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हणाले की, ‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’, त्याने वेळोवेळी आपली चमकदार कामगिरी दाखविली आहे. भारताने पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यश मिळवले याचा आनंद आहे. रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. तो असंख्य खेळाडूंना त्यांची स्वप्न करण्यासाठी आणि आपल्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

हे ही वाचा:

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना १७ महिन्यानंतर जामीन

पॅरिस ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राला ‘रौप्य’ तर पाकिस्तानच्या अर्शदला ‘सुवर्ण’

पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

हॉकीत जिंकलो; भारताला चौथे कांस्य !

नीता अंबानी यांनी देखील नीरज चोप्राचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. त्यांनी आपल्या कामगिरीने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आणि आपल्या यशाने देशाचा उत्साह वाढवला. त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण देशाचा उत्साह वाढवला आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला. तुमची कहाणी पानिपतच्या शिवाजी स्टेडियमपासून पॅरिसच्या स्टेड डी फ्रान्सपर्यंतच्या प्रत्येक खेळाडूसाठी आणि आपल्या सर्वांसाठी आशेचा आणि प्रेरणेचा किरण आहे. भारतीय ॲथलेटिक्सचा खरा दिग्गज म्हणून भावी पिढ्यांसाठी तुमची आठवण राहील. मी तुम्हाला पुढील वर्षांमध्ये आणखी यश आणि वैभव प्राप्त करण्याची इच्छा करते .”

दरम्यान, नीरज चोप्राचे सहा थ्रो पैकी पाच फाऊल होते. दुसऱ्या थ्रोला त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करत चमकदार कामगिरी केली आणि रौप्य पदक हासील केले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले. तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर भालाफेक करत कांस्यपदक मिळविले.

Exit mobile version