जागतिक ऍथलेटिक्सचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी भारताचा ऑलिम्पिक आणि जागतिक भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा याचे कौतुक केले आहे. ‘उसैन बोल्टच्या काळात ‘ट्रॅक अँड फील्ड’ स्पर्धांनी एक मजबूत स्थान मिळाले होते. आताच्या ‘स्टार’ खेळाडूंमुळे या स्पर्धां आणखी मजबूत झाल्या आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
रविवारपासून सुरू होणाऱ्या १४१व्या इंडियन ऑलिम्पिक समितीच्या सत्रासाठी को हे शहरात दाखल झाले होते. ‘मी नीरजमुळे खूप उत्साहित आहे. एकतर त्याचा मजबूत प्रभाव केवळ भारतीय ऍथलेटिक्समध्येच नाही तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या खेळाचा विकास करण्यातही त्याचा निश्चितच पडतो,’ अशा शब्दांत त्यांनी नीरजचे कौतुक केले.
को यांनी स्वतः ऑलिम्पिकमध्ये १५०० मीटर शर्यतीत दोनदा सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. को यांनी विक्रमवीर बोल्टच्या उत्तुंग वारशाचे वर्णन केले. “उसेन बोल्ट खूप मोठा होता, आमच्या खेळात तो एक मोठे व्यक्तिमत्व आहे, पण आता मी पुढे येत असलेल्या आणि सामर्थ्यवान चेहरे असलेल्या खेळाडूंबद्दल अधिक आशावादी आहे.
आमच्या खेळातील – मोंडो डुप्लंटिस (पोल व्हॉल्ट), सिडनी मॅक्लॉफ्लिन (४०० मीटर अडथळ्यांची शर्यत), फेथ किपिएगॉन (१५०० मी, ५००० मी) जेकोब इंजेब्रिग्टसेन (१५०० मी., ५००० मी.) आणि अर्थातच नीरज. हे अत्यंत महत्त्वाचे चेहरे आहेत,’ असे ते म्हणाले.‘प्रत्येक खंडात जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, जे आमच्या खेळाच्या वाढीस मदत करत आहेत. आम्ही याआधी असे म्हणू शकत नव्हतो,’ अशी कबुली त्यांनी दिली.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी
भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा
“उसैन बोल्टच्या विलक्षण कामगिरीमुळे आमच्या खेळात त्याचा अजूनही असलेला प्रभाव आम्ही कोणीही नाकारत नाही. परंतु आमचा खेळ ज्या प्रकारे विकसित होत आहे, हे तुम्ही पाहात असाल, तर उसेन बोल्टच्या वेळेपेक्षा तो आता अधिक मजबूत झाला आहे,’ असे ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताच्या ऍथलेटिक्स पथकाने २९ पदके जिंकल्यामुळे हा खेळ भारतातही उत्साहाचे भरते आले आहे. सन २०२७ची जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियन ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. भारताच्या ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनीही याला दुजारो दिला. “आम्ही औपचारिकरीत्या बोली लावलेली नाही, परंतु आम्ही या संदर्भात चर्चा करत आहोत. दोन दिवसांनी आम्ही त्यावर शिक्कामोर्तब करू,’ असे भारतीय ऍथलेटिक्स असोसिएशन आणि जागतिक ऍथलेटिक्स असोसिएशनने आयोजित पत्रकार परिषद कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
जागतिक ऍथलेटिक्स असोसिशनचे अध्यक्ष म्हणून को यांचा शेवटचा चार वर्षांचा कार्यकाळ आहे. ज्या देशात ऍथलेटिक्स हा खेळवर खोलवर रुजलेला आहे, त्या देशात मोठ्या ऍथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन झालेले नक्कीच आवडेल, असे ते म्हणाले.
को यांचे आजोबा भारतीय होते म्हणाले. “मी येथे इतर खेळ विकण्यासाठी नाही, मी येथे ऍथलेटिक्सला प्रोत्साहन देण्यासाठी आलो आहे आणि मला आमच्या जास्तीत जास्त स्पर्धा भारताच्या मंचावर बघायच्या आहेत. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ही एक अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे. हे असे ठिकाण आहे जे केवळ वैयक्तिकरित्या माझ्यासाठीच नाही तर अॅथलेटिक्सच्या विकासासाठीही खूप महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले.