पॅरिस ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राला ‘रौप्य’ तर पाकिस्तानच्या अर्शदला ‘सुवर्ण’

देशातील सर्वात यशस्वी ऑलिम्पियन ठरले

पॅरिस ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राला ‘रौप्य’ तर पाकिस्तानच्या अर्शदला ‘सुवर्ण’

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकले. ८ ऑगस्टला (गुरुवार) पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर भालाफेक केली. या मोसमात नीरजचा हा सर्वोत्तम थ्रो होता. नीरजने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. त्याने ९२.९७ मीटर भालाफेक केली. त्याने ऑलिम्पिक विक्रम केला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला (८८.५४ मीटर) कांस्यपदक मिळाले.

२०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पाचवे पदक आहे, याआधी भारताने ४ कांस्यपदके जिंकली होती. ज्यापैकी ३ नेमबाजीत आणि एक हॉकीत पटकावले. नीरज चोप्राकडून देशाला सुवर्ण मिळेल अशी सर्वांना आशा होती. मात्र नदीमने सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिक विक्रम मोडून संपूर्ण जगाला चकित केले आहे.

नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल झाला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने ९२.९७ मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम केला. नीरजच्या याआधी भालाफेकचा ऑलिम्पिक विक्रम नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्डकिलसेनच्या नावावर होता, ज्याने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ९०.५७ मीटर भालाफेक केली होती. पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा शेवटचा थ्रो देखील ९० मीटरच्या वर होता, जो ९१.७९ मीटर अंतरावर पडला. पॅरिस ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राला ‘रौप्य’ मिळाल्याने देशभरात त्याचे कौतुक होत आहे. तसेच भारतीय हॉकी संघाने देखील कांस्य पदक मिळवत इतिहास रचला. भारतीय हॉकी संघाने स्पेनचा २-१ असा पराभवानंतर करत कांस्यपदावर नाव कोरले.

हे ही वाचा:

पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर !

हॉकीत जिंकलो; भारताला चौथे कांस्य !

विनेशचे काका महावीर फोगाटनी काँग्रेसला केले चितपट

 

Exit mobile version