नीरज चोप्राचे पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून कौतूक

नीरज चोप्राचे पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून कौतूक

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला असलेली सुवर्ण पदकाची प्रतिक्षा अखेरीस संपुष्टात आली आहे. त्यामुळे देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबद्दल देशातून त्या खेळाडूवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध नेत्यांकडून या खेळाडूचे कौतूक केले जात आहे.

नीरज चोप्रा या खेळाडूने भालाफेक स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. त्याबद्दल संपूर्ण देशातून त्याचे कौतूक केले जात आहे. ॲथलॅटिक्स क्रिडा प्रकारात भारताला प्रथमच सुवर्ण पदक मिळाले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करताना त्याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे देखील म्हटले आहे. त्याबरोबरच त्यांनी भारतासाठी पहिले सुवर्णपदक आणले असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

थुंकणाऱ्यांवर सर्वाधिक दंड आकारला आहे कुर्ल्यात

देशाला कंडक्टर सारखा ‘आगे बढो’ म्हणणारा पंतप्रधान हवा

सगळे पाण्याखाली…. ५३१० हेक्टर शेती, १२१० गावे

दरडग्रस्तांना मदत करण्यात ठाकरे सरकार अपयशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करून नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. तुम्ही आज जे कमावले आहे, ते कायमस्वरूपी लक्षात ठेवले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करताना हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला  सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल त्यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल प्रत्येक भारतीयाला तुमचा अभिमान वाटत आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

या बरोबरच महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांनी ट्वीटरवरून नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. त्याने ८७.५८ मी. लांब भालाफेक केला होता, त्याचा देखील फडणवीसांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

Exit mobile version