२०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा स्टार ऍथलिट नीरज चोप्रा आणि याच ऑलीम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहियासह ११ खेळाडूंची नावे २०२१ च्या खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आली आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, हॉकीपटू पी श्रीजेश आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांनाही २०२१ च्या खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
‘खेलरत्न’ पुरस्कार २०२१ साठी नामांकन मिळालेल्या ११ खेळाडूंची नवे पुढीलपमाणे आहेत.
नीरज चोप्रा (ऍथलेटिक्स)
रवी दहिया (कुस्ती)
पीआर श्रीजेश (हॉकी)
लोव्हलिना बोर्गोहेन (बॉक्सिंग)
सुनील छेत्री (फुटबॉल)
मिताली राज (क्रिकेट)
प्रमोद भगत (बॅडमिंटन)
सुमित अंतिल (भाला)
अवनी लेखरा (शूटिंग)
कृष्णा नगर (बॅडमिंटन)
एम नरवाल (शूटिंग)
हे ही वाचा:
आर्यन खान आजची रात्रही तुरुंगातच काढणार
नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या
‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’
टोकियो ऑलिम्पिक २०२०-२१ मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने आता दीर्घ विश्रांतीनंतर प्रशिक्षण सुरू केले आहे. ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज एनआयएस-पटियाला येथे प्रशिक्षणासाठी परतला आहे. ७ ऑगस्ट रोजी टोकियोमध्ये ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याने काही काळ ब्रेक घेतला होता. ऍथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आणि टोकियोमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला होता. काही दिवसांच्या सुट्टीनंतर नीरज पुन्हा आता सरासावासाठी सज्ज झालेला दिसत आहे. सोशल मीडीयावर नीरजचे चाहतेही मोठ्या प्रमाणावर आहेत.